IMPIMP

Maharashtra Department of Animal Husbandry And Dairying | पशुसंवर्धन विभाग : लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा

by nagesh
Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying | Animal Disease Diagnostic Laboratory In Latur

सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying | लातूर (Latur District) येथे स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा (Animal Disease Diagnostic Laboratory) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Meeting) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying )

या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 51 लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी 11 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर (Nagpur), अकोला (Akola), छत्रपती संभाजी नगर
(Chhatrapati Sambhaji Nagar), नाशिक (Nashik), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), चिपळूण (Chiplun)
अशा 7 ठिकाणी विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत. लातूर विभागामध्ये असलेल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची मोठी संख्या विचारात घेता या विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असणे गरजेचे होते. सध्या येथील पशुपक्षांमधील रोगांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद किंवा पुणे येथे पाठविण्यात येतात. लातूर येथे ही प्रयोगशाळा स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे. (Maharashtra Cabinet Decision)

Web Title : Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying | Animal Disease Diagnostic Laboratory In Latur

Related Posts