IMPIMP

Maharashtra Weather Update | पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

by nagesh
Maharashtra Weather Update | rainfall in various parts of the state including mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra Weather Update | हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी राज्याच्या विविध भागात पावसाने (Maharashtra Weather Update) हजेरी लावली आहे. पुणे (Pune), मुंबईतही (Mumbai) सकाळी सकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह (Vidarbha) कोकण (Konkan), मुंबई परिसरात (Mumbai Area) चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे हैराण झालेल्या पुणे, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत अखेर पावसाला (Maharashtra Weather Update) सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीही मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. पुण्यातही सकाळी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांनाही पावसाचा दिलासा मिळाला आहे. तसेच ठाणे (Thane), नवी मुंबईच्या (Navi Mumbai) परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. पुढील आठवड्यात आषाढी वारीचा (Ashadhi Vari) सोहळा आहे. त्यापूर्वीच पंढरपूरमध्ये (Pandharpur) पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली परिसरात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, पावसाचा जोर कायम नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. खरीपपूर्व मशागतीचे काम पूर्ण झाले असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येईल.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चिपळूणमध्ये (Chiplun) मान्सूनचे आगमन झाले आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचा दुबार पेरणीचा प्रश्न टळला आहे.
या पावसामुळे कोकणात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. चिपळूणसह गुहागर, खेड,
दापोली येथे हलका पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान, अद्याप पुणे (Pune), सांगली (Sangli),
कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) या पश्चिम भागात मात्र म्हणावा तसा पाऊस नाही.

Web Title : Maharashtra Weather Update | rainfall in various parts of the state including mumbai

Related Posts