IMPIMP

MLA Ashish Shelar | …तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आशिष शेलारांचा राज ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

by nagesh
MLA Ashish Shelar | …So we will not leave you, Ashish Shelar’s warning to Raj Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्नाटक निकालावरुन (Karnataka Result) मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपवर टीका केली होती, त्यानंतर दोन हजारांच्या नोटबंदीवरुन (Demonetization) देखील राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला होता. राज ठाकरेंच्या टीकेला भाजप (BJP) नेते आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचं निवेदन आहे की आपण उत्तम नेते आहात अभ्यास करता पण सर्व विषयांवर तुम्ही बोललंच पाहिजे असं नाही, असं आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी म्हटले. ते मुंबई भाजपच्या कर्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले, राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही. ही धरसोड वृत्ती नाही तर जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचं (RBI) धोरण आहे क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy) हे धोरण चर्चेअंती झालेलं आहे. तज्ज्ञांनी यावर मत दिले आहे. हे क्लिन नोट पॉलिसीच्या आधारावर होत आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजार रुपयांची नोट दिली. त्याचवेळी ही तात्पुर्ती व्यवस्था आहे याबाबतचा निर्णय मोदी सरकार (Modi Government) आणि आरबीआयने घोषीत केला होता.

 

शेलार पुढे म्हणाले, 6 लाख 32 हजार कोटीच्या नोटा बाजारात होत्या.
त्यापैकी 3 लाख कोटी नोटा चलनात असतील तर बाकीच्या 3 लाख 40 हजार कोटीच्या नोटा कुठे गायब झाल्या
हे शोधणं प्रामाणिकपणाचं काम आहे. चोर पकडले गेले पाहिजेत, जे सुटलेत त्यांना धरले पाहिजे.
राज ठाकरेंना सांगा मोदी जे करतात ते प्रामाणीक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला जगण्याचं
प्रामाणिकपणे स्थान मिळावं यासाठी करतात असेही शेलार यांनी सांगितलं.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

आमच्यावर टीका करणाऱ्यांचं स्वागत आम्ही करतो. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे.
पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही धरसोड करणारे नाहीत,
मोदी करतात ते प्रामाणिकपणे करतात, असा टोला शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Web Title : MLA Ashish Shelar | …So we will not leave you, Ashish Shelar’s warning to Raj Thackeray

Related Posts