IMPIMP

MLA Ravi Rana | ‘अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या’; रवी राणांचा गंभीर आरोप

by nagesh
MLA Ravi Rana | amravati police commissioner IPS Aarti Singh collect bribe 7 crore rupees sent to uddhav thackeray says mla ravi rana

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग (Amravati CP Aarti Singh) आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्त आरती सिंग या ठाकरे सरकारसाठी वसूली (Recovery) करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली पाठवली असल्याचा खळबळजनक आरोप रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. आरती सिंग यांच्याविरोधातील ऑडिओ क्लिप सीआयडीला (CID) योग्य वेळी देणार असल्याचेही राणा यांनी सांगितले. आरती सिंग दर महिन्याला अमरावतीमधून 7 कोटी रुपयांची वसुली केली असून त्यातील काही पैसे उद्धव ठाकरे यांना पोहोचवले असल्याचा धक्कादायक आरोप रवी राणा यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर (Rana Couple) जेवढे गुन्हे (FIR) दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले होते. तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राणा यांनी केला.

 

महापालिका आयुक्तांवर (Municipal Commissioner) शिवप्रेमींनी शाईफेक केली होती. त्यावेळी मी अमरावतीत
नव्हतो पण माझ्यावर 307 आणि 353 नुसार गुन्हा दाखल केला. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. त्यावेळी माझ्या घरी पोलीस पाठवून नजरकैद ठेवण्यात आल्याचे राणा यांनी सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांनाही तडीपार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 

आरती सिंग यांचे वसूली पथक

 

पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी वसुली पथक नेमले होते. या वसुलीमुळेच अमरावती शहरातील गुन्हे वाढले,
शहरात दंगल झाली. उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या (Murder) झाली, असे गंभीर आरोप रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर केले आहेत.

 

 

पुरावे सीआयडीला देणार

आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली याबाबत तपास
सीआयडीकडे देण्यात आला असल्याची माहिती राणा यांनी दिली.
आमच्याकडे त्यासंदर्भात पुरावे असून ऑडिओ क्लिप (Audio Clip) असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हे सर्व पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Ravi Rana | amravati police commissioner IPS Aarti Singh collect bribe 7 crore rupees sent to uddhav thackeray says mla ravi rana

 

हे देखील वाचा :

PM Kisan चा 12वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकर्‍यांना खुशखबर ! मोदी सरकारने दिला ‘हा’ मोठा दिलासा

Ashish Shelar | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून राज्य सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

Pune Crime | जप्त मालमत्तेचा बँक मॅनेजरनेच केला अडीच कोटींचा अपहार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts