IMPIMP

MLA Sanjay Shirsat | ‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला नाही, त्यामुळे हे रामायण घडले’- आमदार संजय शिरसाट

by nagesh
Tejas Thackeray | uddhav thackeray younger son tejas thackeray political launching shivsainik put poster in girgaum

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत. शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी वेळीच आम्हाला दिलासा दिला असता, तर येवढे रामायण घडल नसते, असे संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले.

 

आजार हा आजार असतो. दुसरे काही कोणी त्याला समजत असेल, तर त्याला बालिशपणा म्हणावा. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन पंधरा मिनिटांचा दौरा केला. सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या घरी चहा पिण्यास गेल्यास किमान वीस मिनिटे लागतात. पण, पंधरा मिनिटात त्यांनी दौरा उरकला. आणि पंधरा मिनिटांत जर पाहणी होत असेल, तर त्याच्यासारखे दुसरे आश्चर्य नाही. उद्धव ठाकरे आमच्याकडे आले, त्यांचे स्वागत आहे. पण येऊन दिलासा न देता निघून जाणे हे काही बरोबर नाही. आम्हाला दिलासा दिला असता, तक एवढे रामायण घडलेच नसते, असे देखील शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधत ठाकरे म्हणाले, या निर्दयी सरकारकडे केवळ भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी आहे. आसूड फक्त हातात ठेवू नका, तो वापारा.
सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडा. आमच्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्यांसोबत करु नका.

 

Web Title :- MLA Sanjay Shirsat | balasahebanchi shivsena shinde group mla sanjay shirsat reaction over uddhav thackeray aurangabad visit

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदा होत आहे, किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला

NCP Chief Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी, शरद पवारांनी सांगितला भू विकास बँकेचा इतिहास

Pune Crime | एसटी प्रवासी नियंत्रकाला एजंटकडून जीवे मारण्याची धमकी, स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना आता घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरायला गेले, भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघात

 

Related Posts