IMPIMP

Kishori Pednekar | आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदा होत आहे, किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला

by nagesh
Kishori Pednekar | our diwali pahat is held every year this is the first time kishori pednekars target to bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप (BJP) आणि शिंदे यांचा गट विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena Uddhav Balasaheb
Thackeray यांच्यातील वाद कायम आहेत. त्यात दोनही गटांकडून सण कोण किती साजरे करते, यावर भर देण्यात येत आहे. आता दिवाळी पहाटच्या
(Diwali Pahat) कार्यक्रमावरुन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपला चिमटा काढला. आमची दिवाळी
पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदा होत आहे, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

 

आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिले आहे. वरळी विधानसभेत (Worli Assembly) दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुरु आहे. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पडत आहे, विचार काही नाही. जांबोरी मैदान रडत आहे. जनता यांच्या कुरघोड्यांनी वैतागली आहे. आमची दिवाळी पहाट दरवर्षी होती. यांची यंदा झाली आहे. हा विचार आणि संस्कार आहे. मोठमोठे अभिनेते आणून केवळ लोकांवर छाप पाडली जात आहे. पण आमची पहाट लोकांमधील कलागुणांना वाव देणारी असते. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. ते लोक वारेमाप पैसा खर्च करुन पाहिजे तसा कार्यक्रम करत आहेत. या देशात मुंबईत नवनवीन पायंडे पाडले जात आहेत. आणि त्याला लोक बळी पडत आहेत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपचा आणि त्यांच्या दिवाळी पहाटचा समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपकडून जांबोरी मैदानावर (Jamboree Grounds) दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर पेडणेकर बोलत होत्या. यावेळी पुढे पेडणेकर म्हणाल्या, इतके दाबूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऐकत नाही, म्हणून ते आमच्यावर टीका करत आहेत.
त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळू शकत नाही.
आम्ही सरकारमध्ये असताना ते टाहो फोडत होते.
भाजप नेहमीच सवयीप्रमाणे भूमिका बदलत आला आहे. शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा न मिळाल्याने त्यांचा शिमगा झाला आहे.
महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष न देणे आणि मुंबई डोळ्यात ठेऊन उद्धव ठाकरे आणि महापालिकेला लक्ष केले जात आहे.

 

Web Title :- Kishori Pednekar | our diwali pahat is held every year this is the first time kishori pednekars target to bjp

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी, शरद पवारांनी सांगितला भू विकास बँकेचा इतिहास

Pune Crime | वास्तुशास्त्र सल्लागाराचे मित्रानेच केले अपहरण, बिबवेवाडी परिसरातील घटना

CM Eknath Shinde | भारत-पाकिस्तान सामन्यात मेलबर्नवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पोहोचली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde | ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक आतषबाजी, म्हणाले – भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…

 

Related Posts