IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना आदेश; म्हणाले – ‘माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको’

by nagesh
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनCM Eknath Shinde | मुंबईत मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा ठेवण्यासाठी संपूर्ण
रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात येत असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. जनतेला होणारा त्रास लक्षात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पोलीस महासंचालक (DGP) आणि मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) आदेश दिले आहेत. आदेशात म्हटले आहे की, माझ्या वाहनांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल (Special Protocol) नको. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांना मार्ग दिल्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते, वाहने थांबवावी लागतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री, मंत्री (Ministers), आमदार (MLA), खासदार (MP), अधिकारी (Officer) आदी मान्यवरांसाठी वाहतूक अडवून मार्ग काढून दिला जातो. परंतु पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले वाहन चालक आणखी त्रस्त होत आहे.

 

म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी, माझ्या वाहनांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे आदेश काढले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेत पोलीस बंदोबस्त कमी करा, कुठही वाहने अडवली जाणार नाहीत याची खबरदारी घ्या.
रुग्णवाहिका (Ambulance) त्या कोंडीत अडकून पडली तर रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, असे शिंदे यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे पोलीसांवरील सुरक्षेचा आणि वाहतूक कोंडी सोडविण्याचा ताण कमी होणार आहे. लोकांचा देखील खोळंबा दूर होणार आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना न्यायालयाच्या निर्देशानंतर (Court Instruction) मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे उतरविण्यात आले होते.
आता हा निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने पोलिसांसह जनतेचा त्रास कमी होणार आहे. शिवाय इंधन बचत सुद्धा होईल.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गाड्यांचा ताफा आता कमी पोलीस संरक्षणात वाहतूक न थांबविता धावणार आहे.
यासाठी पोलिसांना मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सांभाळावी लागणार आहे. तसेच बैठकांना वेळेवर पोहोचण्यासाठी शिंदे यांना कसरत करावी लागणार आहे.
शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth)
आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) यांच्याशी चर्चा करून वरील निर्देश दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | my fleet does not want special protocol in traffic chief minister eknath shindes order to the maharashtra police

 

हे देखील वाचा :

Uday Samant | उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं’

Pune PMC News | माननीयांच्या ताब्यात असलेला महापालिकेचा योगा हॉल त्रयस्थ संस्थेला परस्पर भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस; मनपाने वास्तुला ठोकले टाळे

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दणका ! कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

 

Related Posts