IMPIMP

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत

by nagesh
Monsoon Health Tips | monsoon health tips know what to eat and what to avoid in rainy season

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Monsoon Health Tips | प्रत्येकजण पावसाची प्रतीक्षा करत असतो. कडक उन्हापासून दिलासा देणारा पाऊस अनेक अर्थाने चांगला आहे, पण या ऋतूत खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात चुकीचे खाणे-पिणे तुम्हाला आजारी पाडू शकते. (Monsoon Health Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या प्रकारचे ज्यूस टाळा

पावसाळ्यात ताज्या फळांचा ज्यूस नेहमीच ताजेतवाने ठेवतो. अशावेळी रस्त्यालगतच्या दुकानातून ज्यूस पिऊ नका. तुम्ही फळे विकत घ्या आणि स्वता फळांचा ज्यूस काढा आणि प्या.

 

कच्च्या भाज्या, सॅलड्सच्या सेवनाने होऊ शकते नुकसान
या ऋतूत कच्च्या भाज्या आणि सॅलड्सचे सेवन टाळा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका आहे, ज्यामुळे अनेक मोठे आजार उद्भवू शकतात.

 

दुग्धजन्य पदार्थ टाळा
पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. कारण त्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया लवकर पसरतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर असते. या ऋतूत सर्दी-खोकलाही होतो. शक्यतो कोमट आणि ताजे दूध घ्या. त्याच वेळी, उघड्यावर ठेवलेल्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका. (Monsoon Health Tips)

 

मासे खाणे टाळा
या मोसमात मासे खाऊ नयेत, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो कारण पावसामुळे पाणी सर्वाधिक प्रदूषित होते. अशावेळी मासे खाल्ल्यास रोगराई होऊ शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मसालेदार अन्नापासून दूर रहा
पावसाळ्यात मसालेदार अन्न शक्यतो टाळावे. यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांना पोटसंबंधित आजार आहेत त्यांची प्रकृती थोडी बिघडू शकते. त्यामुळे मसालेदार पदार्थांपासून दूर रहा.

 

पावसाळ्यात या गोष्टी टाळा

1. कुजलेल्या भाज्या आणि फळे खाणे टाळा.

2. पावसाळ्यात दारूचे सेवन करू नये.

3. हिरव्या पालेभाज्या.

4. जास्त कॅफीन असलेले पदार्थ देखील खाऊ नयेत.

5. पावसाळ्यात आईस्क्रीमचे सेवन अजिबात करू नये.

6. पावसाळ्यात कॉफी आणि चहाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे कॉफी आणि चहाचे अतिसेवन टाळावे.

7. थंड चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

8. दूषित अन्न आणि पाणी वापरू नका.

9. तेलकट, मसालेदार आणि स्ट्रीट फूड टाळावे.

 

Web Title :- Monsoon Health Tips | monsoon health tips know what to eat and what to avoid in rainy season

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! दररोज 50 रुपये गुंतवा अन् मिळवा 35 लाखांचा परतावा; जाणून घ्या

Eknath Shinde Government | शिवसेनेला धक्का दिला ! अब की बार, शिंदे सरकार

 

Related Posts