IMPIMP

MP Bhavana Gawali | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ED च्या चौकशीला पुन्हा गैरहजर

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde group mp bhavana gawali replied shivsena uddhav thackeray criticsm

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडीने (ED) शिवसेना नेत्या (Shivsena Leader) खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांना चौकशीसाठी (Inquiry) बोलावले होते. मात्र त्यांनी वकिलांमार्फत आणखी 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. यापूर्वीही ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते मात्र खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे आता ईडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टसह (Utkarsh Pratishthan Trust) काही संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला असल्याचा संशय ईडीला आहे. त्याच्या चौकशीसाठी ईडीने गवळी यांना बोलावले होते. मात्र ईडीने चार समन्स (Summons) पाठवूनही त्या हजर राहिल्या नाहीत. गुरुवारीही त्यांना हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र त्या गैरहजर राहिल्या. त्यांचे वकील इंद्रपाल सिंग (Advocate Inderpal Singh) यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावत काही कागदपत्रे सुपूर्द केली. तसेच खासदार गवळी यांना हजर राहण्यास 15 दिवसांचा अवधी द्यावा अशी मागणी केली आहे.

 

यांसदर्भात बोलताना वकील सिंग म्हणाले की, तपास यंत्रणेने मागितल्याप्रमाणे आम्ही महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या कंपन्यांशी संबंधित काही कागदपत्रे सादर केली आहेत.
याशिवाय उर्वरित कागदपत्रे ही स्थानिक म्हणजे वाशीम पोलिसांकडून घ्यावीत असे सांगितले आहे.
कारण वाशीम पोलीस ठाण्यात (Washim Police Station) भावना गवळी यांनी याबाबत तक्रार दिली होती.
त्याचबरोबर काही कागदपत्रे माहिती अधिकारात (Right to Information) मागवून तपास यंत्रणेला ती कागदपत्रे देण्यास आम्ही तयार आहोत.
त्यासाठी मात्र 15 दिवसांचा वेळ मागितला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात भावना गवळी यांचे नाव आरोपी म्हणून नाही.
त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावले आहेत असेही सिंग यांनी सांगितले.

 

Web Title :- MP Bhavana Gawali | absent for the fourth time ed enquiry requested for 15 days period shiv sena mp bhawana gawali

 

हे देखील वाचा :

Post Office MIS Calculator | पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम ! एकरक्कमी 2 लाख रु. करा जमा; 13200 रुपयांचे होईल गॅरेंटेड इन्कम, जाणून घ्या सविस्तर

Multibagger Stock | 2.50 रुपयांवरून 130 वर आला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, 2 वर्षांमध्ये 1 लाख रुपयांचे झाले 50 लाख

Chhagan Bhujbal | ‘ओबीसी आरक्षणासाठीचा न्याय पंतप्रधानांनी द्यावा’; छगन भुजबळांची मागणी

 

Related Posts