IMPIMP

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल भाकीत आणि राष्ट्रवादीत गोंधळ

by nagesh
Gopichand Padalkar | discussion in islampur on gopichand padalkar statement about jayant patil joining bjp

इस्लामपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे (BJP) विधान परिषद आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात मोठे राजकीय वाद आहेत. मागील आठवड्यात गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक भाकीत केले होते. काही दिवसांत जयंत पाटलांच्या घरावर देखील भाजपचा झेंडा असेल, असे पडळकर म्हणाले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर देखील भाजपचाच ध्वज असेल, असे देखील पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया देत, आम्हाला तोडणे शक्य नाही, असे म्हंटले होते. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेतून गेल्यावर बंडखोर शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप सरकार सत्तेत आले. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Opposition Leader) म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांना ते पद न मिळता अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेता झाले. त्यामुळे जयंत पाटलांचा चाहतावर्ग नाराज आहे. राष्ट्रवादीने त्यानंतर जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी (NCP Maharashtra State President) फेरनिवड केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस देखील थोडीशी अस्वस्थ दिसत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या नेत्यांमध्ये विविध चर्चा आहेत.
त्यातच गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटील भाजपमध्ये येतील, असे भाकीत करुन गोंधळ उडवून दिला.
त्यामुळे जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे. माजी मंत्री शिवाजी नाईक (Shivaji Naik) यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची सत्ता वाढली आहे. त्यामुळे गोपिचंद पडळकर त्यांना डिवचत आहेत.

 

 

Web Title :- Gopichand Padalkar | discussion in islampur on gopichand padalkar statement about jayant patil joining bjp

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गुगल पे वर पैसे पेड केल्याचे भासवून लॅपटॉप नेला चोरुन

Pune Traffic Police | 60 लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणारे वाहतूक पोलिस अधिकारी निर्धास्त कसे ! बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये कर्तव्यदक्षतेपेक्षा ‘वशिला’ आणि ‘पैसा’च चालतो हा समज पक्का होतोय

Eknath Khadse | खडसेंवरील ‘झोटिंग समिती’चा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंचे गणित बहुतेक कच्चे आहे, ते 25 हजारांना 50 हजार म्हणत आहेत, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

 

Related Posts