IMPIMP

MP Shrikant Shinde | ‘मला अजून उलगडायला लावू नका…’; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

by nagesh
MP Shrikant Shinde | MP shrikant eknath shinde answer allegations  of fraud in mumbai road by aaditya thackeray

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन-  शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी
ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना इशारा दिला
आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावर खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde)
यांनी आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याची टीका केली. तसेच ते कंत्राटदारांची भाषा करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) म्हणाले, कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोक करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन काही लोकं आले आहेत. त्यांना बरोबर रेट माहित आहे. कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहिती आहे, कारण 25 वर्षे त्यांनी तेच केले आहे. मला अजून उलगडायला लावू नका, असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

 

 

काहीजण दिवसा स्वप्न पाहतात

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी 2024 मध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा केला आहे. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, इथं प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. लोक रात्री स्वप्न पाहतात, मात्र काही लोक आता दिवसाही स्वप्न पाहायला लागली आहेत. त्यामुळे इतरांच्या स्वप्नावर आम्ही काहीही बोलू शकत नाही.

 

 

 

आम्हाला न्यायालयाची धास्ती नाही

निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय आमच्या बाजूने लागला आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court) सत्याच्या बाजूने निकाल लागेल. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची धास्ती वगैरे काही नाही. तांत्रिकदृष्ट्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आम्ही तंतोतंत केल्या आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.

 

 

काम न करणारे सरकार उलथवलं

शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. टीका करतानाही प्रत्येक जण पातळी राखत होता. परंतु गेल्या 10 महिन्यापूर्वी अडीच वर्षाचं सरकार गेलं. काहीच काम न करणारं सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वान उलथवलं गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. त्यातून विरोधक अद्याप सावरले नाहीत, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वज्रमूठ राहते की वज्रझूठ ठरते पाहायला मिळेल

ते आधी आमच्यावर टीका करत होते, मात्र आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)
घटक पक्ष एकमेकांवर टीका करत आहे. कारण हे एका विचारधारेने बरोबर आलेले नाहीत.
हे सत्तेसाठी विचारांना बाजूला ठेऊन तडजोड करुन हे सरकार सत्तेत आलं होतं.
ते आज वज्रमूठ सभेच्या माध्यमातून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांनी ती वज्रमूठ (Vajramuth Sabha) राहते की वज्रझूठ ठरते हे पाहायला मिळेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

 

 

Web Title :-  MP Shrikant Shinde | MP shrikant eknath shinde answer allegations  of fraud in mumbai road by aaditya thackeray

 

हे देखील वाचा :

Pakistan Ex PM Imran Khan Arrested | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक (Video)

Kukadi Dawa Kalwa | कुकडी डाव्या कालव्याचे 22 मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

 

Related Posts