IMPIMP

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule appeal nitin gadkari to solve traffic jam issue in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या हडपसर ते सासवड या पालखी महामार्गावर प्रवास करत असताना, वाहतूक कोंडीत (Traffic Jam) अडकल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी गाडीतून खाली उतरत वाहनचालकांना गाड्या काढण्यासाठी सूचना केल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुळे या हडपसर सासवड पालखी महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यावेळी कंटाळून त्यांनी स्वत: गाडीतून उतरत वाहतूक कोंडी सुरळीत केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी ट्वीट करत या वाहतूक कोंडीची माहिती दिली आहे. खासदार सुळे (MP Supriya Sule) यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. एक लहान ट्रक बंद पडल्याने ही कोंडी झाली होती. त्यानंतर सुळे यांनी स्वत: खाली उतरत आजूबाजूच्या वाहनांना वाट करुन दिली.

 

 

ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी टॉप प्रायोरिटीवर लक्ष देण्याची गरज आहे.
या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.
आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना टॅग केला आहे.
त्यात त्यांनी यावर तातडीने उपाय काढण्याची विनंती गडकरींना केली आहे.
“केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते
मार्गी लावणे आवश्यक आहे. कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा”, असे सुळे म्हणाल्या.

 

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule appeal nitin gadkari to solve traffic jam issue in pune

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त

Vaibhav Khedekar | मनसेच्या वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार

 

Related Posts