IMPIMP

Vaibhav Khedekar | मनसेच्या वैभव खेडेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार

by nagesh
Vaibhav Khedekar | mns state general secretary vaibhav khedekar is likely to be in trouble again

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) हे मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून, रत्नागिरीचे एलसीबी (LCB Ratnagiri) पथक सध्या खेडेकर यांच्या शोधात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना अटक होण्याची शक्यता असताना, खेडेकरांनी खेड न्यायालयात (Khed Court) अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती कळत आहे. बुधवारी रात्रीपासून खेडेकर यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडे चौकशी केली.
त्यामुळे आता अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यास खेडेकर यांना अटक होऊ शकते.

 

यापूर्वी देखील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 6 वर्षांसाठी निवडणुकीतून अपात्र करण्यात आले होते.
त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले होते.
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात ही कारवाई करण्यात आली होती.
विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हे आदेश दिले होते.
त्यामुळे आता पुन्हा एकदा गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणी खेडेकर यांची अडचण वाढणार आहे.

 

 

Web Title :- Vaibhav Khedekar | mns state general secretary vaibhav khedekar is likely to be in trouble again

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | पवार-शिंदेंची सोयरीक सांगत शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले- ‘मुलीसाठी जावयाच्या सूचना ऐकाव्याच लागतील’

Hingoli News | नोटीस पाहण्यासाठी लाचेची मागणी, शेतकऱ्याच्या लेकानं इंग्रजीत काढली खरडपट्टी

Ambadas Danve | असल्या गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

MLA Rohit Pawar | भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर जनता निवडणुकीत देईल – रोहित पवार

 

Related Posts