IMPIMP

Multibagger Penny Stock | वर्षभरात 1 लाख रुपयांची गुंतवणूक झाली 25 लाख, ‘या’ पेनी स्टॉकने दिला बंपर रिटर्न

by nagesh
Multibagger Stock | ttml turned 1 lakh rupee investment into 50 lakh in just 2 year

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Penny Stock | मागील वर्षभरात सेन्सेक्स (Sensex) 10 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Penny Stock) ने या कालावधीत 2,332.7 टक्क्यांची जबरदस्त झेप घेतली आहे. अशाप्रकारे, Brightcom Group च्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 2,332.7 टक्के रिटर्न दिला. 12 फेब्रुवारी 2021 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 6.17 रुपये होती, जी सोमवारी बीएसईवर 150.10 रुपये झाली. या वाढीचा अर्थ असा आहे की जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम आता 24.32 लाख रुपये झाली असती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या शेयरची आजची वाटचाल (Brightcom Group Share Price Today)
हा मिडकॅप स्टॉक मागील सत्रात बीएसईवर रु. 157.70 वर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात त्यात घसरण दिसून आली आणि तो 149.85 रुपयांपर्यंत खाली आला. मात्र, त्यात पुन्हा एकदा थोडी सुधारणा दिसून आली आणि दिवसभराच्या व्यवहारादरम्यान तो एका वेळी 150.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 15,608 कोटी रुपये आहे.

 

या वर्षी शेअर्सची झाली आहे घसरण
2022 मध्ये आतापर्यंत कंपनीचे शेअर 16.31 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीचा शेयर 24 डिसेंबर 2021 रोजी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. 24 डिसेंबर 2021 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 204.80 टक्क्यांवर पोहोचली होती. जर आपण 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीबद्दल बोललो तर 5 मे 2021 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 5.82 रुपये होती. अशाप्रकारे, 5 मे 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 7 महिन्यांत 3,418 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Multibagger Penny Stock)

 

असा आहे शेअर होल्डिंगचा पॅटर्न
25 जानेवारी 2022 पर्यंत, कंपनीच्या 15 प्रमोटर्सची कंपनीत 19.74 टक्के भागीदारी होती. त्याचवेळी, सार्वजनिक भागीदारी 80.26 टक्के होती. 2,11,987 शेयरधारकांकडे कंपनीचे 94.83 कोटी शेयर आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कंपनी आणि तिचा व्यवसाय
Brightcom Group जगभरातील अ‍ॅड – टेक, न्यू मीडिया आणि IoT च्या कॉन्सॉलिडेशनचे काम करते.
कंपनी प्रामुख्याने डिजिटल इकोसिस्टममध्ये सक्रिय आहे.
कंपनीच्या ग्राहकांमध्ये Airtel, British Airways, Coca Cola, Hyundai Motors यांचा समावेश आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock latest news this stock has given 2332 pc return in one year

 

हे देखील वाचा :

PM Kisan KYC | शेतकर्‍यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 11व्या हप्त्याबाबत आली नवीन माहिती, जाणून घ्या कुणाला होणार फायदा

Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

 

Related Posts