IMPIMP

Murbad Crime | वार्तांकन करताना पत्रकारास शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तालुक्यातील पत्रकारांनी दिला उपोषणाचा इशारा

by nagesh
Murbad Crime | Abusing a journalist while reporting, threatening to kill; Journalists in the taluka warned of a hunger strike

मुरबाड : सरकारसत्ता ऑनलाइनMurbad Crime | मुरबाड तालुक्यात (Murbad Taluka) एक महिन्या पासून सेवा सहकारी सोसायटी निवडणूक (Seva Sahakari Society Election) सुरु आहे. यावेळी वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारास (Journalist) वार्तांकन करण्यास अडथळा करून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. ही घटना मुरबाड तालुक्यातील (Murbad Crime) नारीवली येथे घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नारीवली येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रविवारी (दि.20) पार पडली. या निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेले पत्रकार अरुण ठाकरे (Journalist Arun Thackeray) यांना निवडणूक आचारसंहिता (Code of Conduct) भंग करणारा बॅनर आढळला. त्यानंतर ठाकरे हे त्याठिकाणी फोटो काढत असताना त्यांना भाजपाचे (BJP) ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर (Thane Zilla Parishad Member Ulhas Bangar) व त्यांचा मुलगा तेजस उल्हास बांगर (Tejas Ulhas Bangar) तसेच जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र भोईर (Ramchandra Bhoir) हे ठाकरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी ठाकरे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ (Abusive) करून जीवे मारण्याची धमकी दिली. ईथुन निघून जा अन्यथा विपरीत घडेल अशी धमकी दिली. तसेच तालुक्यातील पत्रकारांना उद्देशून पत्रकार काय आहेत त्यांची लायकी काय आहे असे वक्तव्य करून दमदाटी केली. (Murbad Crime)

 

लोकशाहीचा (Democracy) चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार हे लोकांसमोर खरे रूप आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु असे काही बांडगुळ पत्रकारांना वार्तांकन करत असताना धमकी देत असतील तर लोकशाही टिकेल का? असा प्रश्न पडला आहे. या घटने विषयी मुरबाड पोलीस ठाण्यात (Murbad Police Station) पत्रकार ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी दिले. या घटनेबाबत मुरबाड मधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पांढरे (Police Inspector Pandhare) यांची भेट घेऊन ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

एक वर्ष होऊन गेलेल्या ग्रामपंचायत निवडणूकवेळी सुध्दा जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र मारुती भोईर यांनी
मतदान चालू असताना गावकऱ्यांवर वीट उचलून शिवीगाळ करत आचार संहितेचा भंग केला.
यावेळी जी. प. शिक्षक शरद रामचंद्र चौधरी, शासकीय आश्रम शाळा भालचंद्र तानाजी भोईर यांनी
या संदर्भात तक्रारी अर्ज केला असून या प्रकारावरून जी. प. शिक्षक शासनाच्या नियमाची पायमल्ली करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच डोळेझाक करत असलेल्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी (Inquiry) करून त्यांच्यावर कठोर कारवाही करावी.
अन्यथा मुरबाड तालुक्यातील सर्व पत्रकार आमरण उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचे जाहीर केले.
तसे पाठिंब्याचे पत्र ही दिले आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कारवाई करावी.

 

 

Web Title :- Murbad Crime | Abusing a journalist while reporting, threatening to kill; Journalists in the taluka warned of a hunger strike

 

हे देखील वाचा :

Stock Market | गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न ! ‘या’ कंपनीचा 10 पैशाचा शेअर गेला 571 रुपयांवर, 10 हजाराचे झाले 5 कोटी

Shridhar Patankar | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का ! उध्दव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची कोट्यावधी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

Tata Group Stocks | टाटा ग्रूपच्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; राकेश झुनझुनवालांचेही प्राधान्य

 

Related Posts