IMPIMP

Nagpur ACB Trap | मंत्रालयात ‘दलाली’? 25 लाखाच्या लाच प्रकरणी शेखर भोयर व दिलीप खोडे अ‍ॅन्टी करप्शनकडून ‘गोत्यात’; विधान परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी…

by nagesh
Nagpur ACB Trap | 'brokerage' in the ministry? Shekhar Bhoyer and Dilip Vamanro Khode 'under arrest' by Nagpur Anti-Corruption in 25 lakh bribery case; To ask questions in Legislative Council...

नागपूर :सरकारसत्ता ऑनलाईन – Nagpur ACB Trap | विधान परिषदेत (Vidhanparishad) प्रश्न उपस्थित न करण्यासाठी व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता 2 केसेसचे प्रत्येकी 50 लाख रूपये असे एकुण 1 कोटी रूपयाच्या लाचेची मागणी (Demand Of Bribe) करून त्यापैकी 25 लाख रूपयाची लाच सरकारी पंचासमक्ष घेतल्याप्रकरणी नागपूरच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाने (Nagpur ACB Trap) अमरावती येथील MIDC मधील टेक्नीशियन दिलीप वामनराव खोडे Dilip Vamanrao Khode (50, रा. 1203, वूड रोड, हिरानंदानी मिडास, वसंत विहार, काशिनाथ घाणेकर सभागृह जवळ, ठाणे पश्चिम) याला रंगेहाथ पकडले आहे. त्याचा साथीदार शेखर भोयर Shekhar Bhoyer (रा. अमरावती याच्याविरूध्द देखील भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल (Nagpur Crime News) करण्यात आला आहे. खोडे आणि भोयर हे मंत्रालयात (Mantralaya, Mumbai) ‘दलाली’ करत होते की काय असाच प्रश्न समोर आला आहे. (Nagpur Bribe Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरूध्द आमदार वजाहत मिर्झा Congress MLC Wajahat Mirza (विधान परिषद) यांच्याकडे तक्रारदाराच्या विभागातील महिला अधिकार्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारीबाबत विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित न करण्यासाठी तसेच तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता दि. 28 मार्च रोजी आरोपींनी 2 केसेसचे प्रत्येकी 50 लाख असे एकुण 1 कोटी रूपये मागितले. दि. 28 मार्च रोजी तडजोडीअंती आरोपी दिलीप वामनराव खोडे याने सरकारी पंचासमक्ष 25 लाख रूपये लाच म्हणून घेतले. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. भोयर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nagpur ACB Trap)

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अप्पर अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन मत्ते (PI Sachin Matte),
निलेश उरकुडे (PI Nilesh Urkude), श्रीमती प्रीती शेंडे (PI Priti Shende),
पोलिस अंमलदार सुशिल यादव, पंकज घोडके, हरीष गांजरे, बादल मांढरे,
सूरज भोंगाडे आणि चालक विनोद नायगमकर यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Nagpur ACB Trap | ‘brokerage’ in the ministry? Shekhar Bhoyer and Dilip Vamanro Khode ‘under arrest’ by Nagpur Anti-Corruption in 25 lakh bribery case; To ask questions in Legislative Council…

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवतीची आत्महत्या

MP Girish Bapat | 3 टर्म नगरसेवक अन् 5 टर्म आमदार, भाजपसाठी ‘किंगमेकर’ असलेल्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

Union Minister Piyush Goyal | ‘ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा गौप्यस्फोट

 

Related Posts