IMPIMP

Nagpur Crime | धक्कादायक ! फेसबुकवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

by nagesh
Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइनNagpur Crime | सोशल मीडीयाचा वापर वाढत असताना गुन्हे देखील वाढत आहेत. नागपूर (Nagpur Crime) येथील एका अल्पवयीन मुलीसोबत फेसबुकवर मैत्री करुन तिला एका प्लॅटवर घेऊन जाऊन 4 ते 5 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape in Nagpur) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.10) रात्री अंबाझरी पोलीस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपींनी 2 फेब्रुवारी रोजी तरुणीला एका फ्लॅटवर घेऊन गेले. त्याठिकाणी पार्टी केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान अशीच एक घटना तीन दिवसांपूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या (Wadi Police Station) हद्दीतील लावा परिसरात घडली होती. आरोपींनी एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक अत्याचार केले होते. त्यानंतर गुरुवारी आणखी एक घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात (Nagpur Crime) खळबळ उडाली आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेतील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 17 वर्ष 8 महिन्यांची असून अंबाझरी ठाण्यांच्या हद्दीत राहते.
काही दिवसांपूर्वी तिची फेसबूकवर एका तरुणाशी मैत्री झाली होती.
2 फेब्रुवारीला तरुणाने तिला रवी नगर चौकात (Ravi Nagar Chowk) भेटायला बोलावले.
तेथून तिला जाफरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि पार्टी केली.
त्यानंतर तरुणीवर 5 ते 6 तरुणांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणानंतर तरुणी घाबरलेली होती. गुरुवारी सायंकाळी तिने हिंमत करून अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनीता साहू (DCP Vinita Sahu) या पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी तरुणीकडून घटनेची पूर्ण माहिती घेतली. गुन्हे शाखेसह (Nagpur Police Crime Branch) इतर पोलीस ठाण्यातील डीबी स्क्वॉडही (Detection Branch) आरोपींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nagpur Crime | Shocking After Facebook friendship gang rape on minor girl

 

हे देखील वाचा :

Indian Railways | 8 सेवा एकत्रित करून केली एक, अस्तित्वात आले IRMS, नोटिफिकेशन जारी

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 2197 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात पुणे शहर पोलिस दलातील 2 कर्मचारी निलंबित

 

Related Posts