IMPIMP

Indian Railways | 8 सेवा एकत्रित करून केली एक, अस्तित्वात आले IRMS, नोटिफिकेशन जारी

by nagesh
Central Railway | Demand to implement promotion reservation in Central Railway, otherwise All India SC, ST Railway Employees Association warns of march

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Railways | रेल्वेच्या विविध सेवांचे विलीनीकरण करून तयार करण्यात आलेले इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (Indian Railways Management System-IRMS) केडर आता अस्तित्वात आले आहे. सरकारने यासंदर्भात राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे. आयआरएमएसमुळे अधिकार्‍यांच्या ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Indian Railways)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेल्वेच्या (Indian Railways) आठ सेवांचे एकत्रीकरण करून एक केडर तयार करण्याचा निर्णय पीयूष गोयल रेल्वेमंत्री (Railway Minister) असताना घेण्यात आला होता.

 

रेल्वेने सांगितले आहे की, महाव्यवस्थापकाच्या (Railway General Manager) 27 पदांमध्ये सुधारणा करून त्यांना वरचा दर्जा दिला जाईल. जुन्या सेवेतील पात्र अधिकार्‍यांना महाव्यवस्थापक हे उच्च श्रेणीचे पद दिले जाईल याची काळजी घेतली जाईल. कॅबिनेट नोटमध्ये असे म्हटले आहे की केवळ IRMS चे अधिकारीच रेल्वे बोर्डा (Railway Board) चे अध्यक्ष/कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी सदस्य होण्यास पात्र असतील.

 

यासाठी बनवले एक केडर

आतापर्यंत देशात धावणार्‍या रेल्वेशी संबंधित विविध केडर होते. 2019 मध्ये, सरकारने भारतीय रेल्वेमधील अभियांत्रिकी, वाहतूक, यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल यासह विविध विभागांसाठी सध्याच्या आठ सेवांऐवजी फक्त एक केडर ’भारतीय रेल्वे सेवा’ तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

 

यामुळे रेल्वेच्या कामाची प्रक्रिया अधिक चांगली होईल, असा सरकारचा विश्वास आहे. जलद निर्णय घेणे, संस्थेचे चांगले स्वरूप, नोकरशाहीला आळा घालणे आणि तर्कशुद्ध निर्णय घेणे याला प्रोत्साहन दिले जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेल्वे सेवांचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगून
तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते की,
या निर्णयानंतर प्रत्येकजण डिपार्टमेंटवर विचार करतील, गटबाजी संपेल.
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेबाबत सर्वांची संमती घेण्यात आली आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

 

मात्र, रेल्वेच्या विविध सेवेतील अधिकार्‍यांमध्ये संवर्ग विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती.
त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीवर परिणाम होईल, असे सांगत सुरुवातीला अधिकार्‍यांनी यावर आक्षेप घेतला होता.
सुरुवातीला सरकारलाही जोरदार विरोध होईल असे वाटले, पण तसे झाले नाही.

 

कोणत्या सेवा विलीन झाल्या

या केडरमध्ये Indian Railway Service of Engineers (IRSE), Indian Railway Service of Mechanical Engineers,
Indian Railway Service of Electrical Engineers (IRSEE), Indian Railway Stores Service (IRSS), Indian Railway Service of Signal Engineers (IRSSE), Indian Railway Traffic Service (IRTS), Indian Railway Personnel Service (IRPS), Indian Railway Accounts Services (IRAS) जोडण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Indian Railways | irmc came into existence indian railways issues gazette notification to unify 8 services

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 2197 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात पुणे शहर पोलिस दलातील 2 कर्मचारी निलंबित

Pune Metro | महामेट्रोकडून 82.5 किलोमीटर लांबीचे नवीन 7 मार्ग प्रस्तावित

 

Related Posts