IMPIMP

Nana Patole | ‘सध्या जे नवीन हिंदुहृदयसम्राट झालेले आहेत तेच…’, दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटोलेंचा शिंदे गटाला टोला! (व्हिडिओ)

by nagesh
Nana Patole | congress nana patole criticizes state government after high court verdict on dussehra mela

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन  – शिवाजी पार्क मैदानावरील (Shivaji Park Ground) नियोजित दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) निर्णय अयोग्य आणि कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याची टिप्पणी करीत उच्च न्यायालयाने (High Court) शुक्रवारी तो रद्द करुन शिवसेनेला दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेण्यासाठी परवानगी दिली. यावरुन राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपचे (BJP) अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दरवर्षी दसरा मेळावा होतो, जो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यापासून होत आहे. काँग्रेसच्या राजवटीत ते काँग्रेसवर टीका करायचे, मात्र तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेसने पाठिंबा दिला. सध्या जे नवीन हिंदुहृदयसम्राट झाले आहेत तेच हिंदूंच्या व्यवस्थेला विरोध करताना आपण पहात आहोत.

 

 

राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल (Law and Order) बोलायचे झाले तर तुम्ही पाहिले असेल की या गटाचा एक आमदार गणेशोत्सवात मुंबईत स्वत: बंदुक चालवत होता.
त्यावर गुन्हे (FIR) दाखल झाले. बंदुकीच्या गोळ्या सापडल्या.
अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु असेल,
तर ही सगळ्यात मोठी घातक व्यवस्था राज्यात निर्माण झाली आहे.
त्याचा प्रशासनावर ताण पडतोय. कारण सरकारच कायदा सुव्यवस्था बिघडवायला निघाले आहे.
म्हणून अशा परिस्थितीत काल न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करतो असेही नाना पटोले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | congress nana patole criticizes state government after high court verdict on dussehra mela

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Diabetes Diet | ब्लड शुगरच्या रुग्णांनी कोणत्या डाळी, भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्या? पहा यादी

Health Tips | सर्दी-खोकल्यापासून पचनापर्यंत, ‘हे’ एक सुपरफूड तुम्हाला ठेवते फिट

 

Related Posts