IMPIMP

Nana Patole | बाळासाहेब थोरात यांच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यावर बोलले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; म्हणाले…

by nagesh
Nana Patole | nana patole comment on speculations of resignation by balasaheb thorat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Nana Patole | काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी या राजीनाम्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर देखील गंभीर आरोप केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत विचारले असता नाना पटोले यांनी असं काही झालं नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, ‘आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो. अशी मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा तर त्यांनी राजीनामा दिला नाही.’ असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

तर यावर पुढे बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, ‘कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. असं असताना काही लोक तर वर्ष-वर्ष घेत नव्हते. मात्र, आमची मागील महिन्यातच कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता पुन्हा १५ फेब्रुवारीला अशीच एक बैठक होणार आहे. त्यात या पोटनिवडणुकींची रणणीती बनविणे, आत्ताच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात विजयी (Winners in Graduate and Teacher Constituencies) आमदारांचा सत्कार आणि राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) असे चाललेले यात्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे.’ अशी माहिती यावेळी बोलताना नाना पटोले यांनी दिली.

 

आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आलेला नाही. असेह देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
ते म्हणले की, ‘१५ फेब्रुवारीच्या कार्यकारणी बैठकीत पक्षातील घडामोडींवरही चर्चा केली जाईल.
आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही.
माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत.’ असा टोला देखील यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांना लगावला.
तर त्यापुढे बोलताना पटोले म्हणाले की, ‘६ फेब्रुवारीला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत
(Kasba Assembly By-election) काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला.
त्यावेळी आमचे दोन नेते व्यक्तिगत कामामुळे येऊ शकले नाही, तर त्याच्या बातम्या झाल्या.
मात्र, भाजपाची साधी चर्चाही होत नाही. तिथं भाजपाची काय अवस्था आहे हे निकालात पाहायला मिळेल.’
असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole comment on speculations of resignation by balasaheb thorat

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | चंदन चोरट्यांचे वाढते धाडस; एसआरपीएफ ग्रुपमध्ये जाऊन चंदनाचे झाड नेले चोरुन

Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं

Latur ACB Trap | दहा हजाराची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता जाळ्यात

 

Related Posts