IMPIMP

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के

by nagesh
Naresh Mhaske | cm eknath shinde group naresh mhaske mocks sharad pawar sanjay raut sushma andhare

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन  Naresh Maske | डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवरुन बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) (शिंदे गट – Shinde Group) आणि शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray (ठाकरे गट – Thackeray group) यांच्यात वाद सुरु आहेत. गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) रोजी दोनही गटांत मोठे वाद झाले होते. त्यामुळे या शाखेवर पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला होता. त्यावर आता ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि इतर लोक गेल्या अनेक वर्षांत इकडे फिरकले नाहीत. त्यांनी या शाखेवर कधी लक्ष दिले नाही. साधे लाईटीचे बील किंवा रंग रंगोटी त्यांनी कधी केली नाही. आता शिवसेना फुटल्यावर ठाण्यातील 99% लोक शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ही शाखा आमची आहे. शाखाप्रमुख राजेश मोरे (Rajesh More) हे आमच्यासोबत असल्याने तेच खरे शाखाप्रमुख आहेत. शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा हा विषय नाही. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली या शाखेत काम सुरू होते. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे (Gopal Landage), शहर प्रमुख राजेश मोरे या शाखेत बसून शिवसेनेचे काम पाहत होते, असे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सांगितले.

 

वांद्र्याचा माणूस बांधावर कधी जातो, बांधावरून परत कधी वांद्रेत येतो, हे कळत नाही.
उद्धव ठाकरेंचे हे लक्झरी दौरे आहेत. जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती,
तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुम्ही घराबाहेर पडलात का, शेतकऱ्यांना तीन वर्षांपूर्वी आपण मदत जाहीर केली का,
असे प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केले आहेत. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्यावर लगोलग मदत त्यांनी दिली, असे नरेश म्हस्के म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Naresh Maske | ‘When Thackeray was in power, nothing was done for the farmers’ – Naresh Maske

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘मातोश्रीवर बसून लोकांची दु:खे कळत नाहीत’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | फटाका स्टॉलवरुन फटाके घेऊन जाऊन जीवे मारण्याची दिली धमकी; सराईत गुन्हेगारासह टोळक्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण

 

Related Posts