IMPIMP

T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण

by nagesh
T20 World Cup | t20 world cup pakistan semi final hopes is in indias hand see the permutation sport news

 सरकारसत्ता ऑनलाइन  – सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरु आहे. या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे उरलेले सामने पाहायला नक्कीच रंगत येणार आहे. कालच्या सामन्यात झिम्बाब्वेने (Zimbabwe) शेवटच्या बॉलवर पाकिस्तानचा (Pakistan) एक रनने पराभव केला. टी-20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर शेवटच्या बॉलवर थरारक विजय मिळवला होता. सलग झालेल्या दोन पराभवामुळे पाकिस्तानचे सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतावर राहावे लागेल अवलंबून

पाकिस्तानला आता सेमी फायनलला पोहोचायचं असेल तर त्यांना उरलेल्या तीनही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. एवढेच नाहीतर त्यांना टीम इंडियावरही अवलंबून राहावं लागणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारताचा विजय झाला तर पाकिस्तानसाठी सेमी फायनलच्या आशा कायम राहतील, पण दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला तर मात्र पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल.

 

 

काय आहे समीकरण ?

पाकिस्तानच्या उरलेल्या मॅच या आता नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध होणार आहेत. या तीनही सामन्यात जर पाकिस्तानचा विजय झाला तर त्यांच्या खात्यात 6 पॉईंट्स जमा होतील. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे उरलेले सामने हे भारत, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्याविरुद्ध आहेत. यामध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे. आफ्रिकेचा नेदरलँड्सविरुद्ध विजय झाला आणि भारत-पाकिस्तानवरिुद्ध पराभव झाला तर त्यांच्या खात्यात जास्तीत जास्त 5 पॉईंट्स होतील आणि पाकिस्तानचा मार्ग मोकळा होईल. (T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाकिस्तानचे उरलेले सामने

30 ऑक्टोबर- नेदरलँड्सविरुद्ध

3 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

6 नोव्हेंबर- बांगलादेशविरुद्ध

 

 

दक्षिण आफ्रिकेचे उरलेले सामने

30 ऑक्टोबर- भारताविरुद्ध

3 नोव्हेंबर- पाकिस्तानविरुद्ध

6 नोव्हेंबर- नेदरलँड्सविरुद्ध

 

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup pakistan semi final hopes is in indias hand see the permutation sport news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा

Earthquake Koyna Dam | कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला

 

Related Posts