IMPIMP

Chandrakant Patil | ‘मातोश्रीवर बसून लोकांची दु:खे कळत नाहीत’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | 'People's sufferings are not understood by sitting on Matoshree' - Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले. मातोश्रीत बसून लोकांची दु:खे कळत नाहीत, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दोन विरोधी पक्षांनी एकमेकांसोबत राजकीय विरोधाचे संबंध ठेवले पाहिजेत. कोणीही वैयक्तित पातळीवर कोणावर टीका करु नये. राजकारण राजकारणासारखे करावे. राजकारणी जर का पातळी सोडून भांडत असतील, तर सर्वसामान्य माणसे त्याबद्दल चिंता व्यक्त करतात. देशात महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले कारण, ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासोबत संवाद साधला. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना हे सर्व उशिरा कळाले. यांना बराच काळ असे वाटत होते की, मातोश्रीवर बसून लोकांची दु:खे कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला. त्यांनी आता जे दौरे सुरु केले आहेत. ते उशिरा सुरु केले आहेत. त्यांनी अडीच वर्षे हे दौरे केले पाहिजे होते. पण त्यांनी त्यावेळी केले नाही. आता ते दौरे करत आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असें पाटील म्हणाले.

 

बऱ्याच वर्षांनी आम्ही 2088 पदासांठी प्राध्यापकांच्या नव्या भरत्या करत आहोत.
कोवीड काळातील मागणीसाठी या भरत्या आहेत.
यानंतर आम्ही पुन्हा एकदा अभ्यास करुन भरत्या घेण्याची गरज पडल्यास त्या घेऊ, असे पाटील म्हणाले.
याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील भाष्य केले. महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी त्यांनी 2024 पर्यंत टिकले पाहिजे. ते टिकले तर पुढील विचार करता येईल. तसेच अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्यासाठी आघाडीला 2024 साली बहुमत आले पाहिजे. तो पर्यंत ते एकत्र राहतील का? असा प्रश्न आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ‘People’s sufferings are not understood by sitting on Matoshree’ – Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फटाका स्टॉलवरुन फटाके घेऊन जाऊन जीवे मारण्याची दिली धमकी; सराईत गुन्हेगारासह टोळक्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

T20 World Cup | पाकिस्तानचे भवितव्य आता भारताच्या हातात, नेमके काय आहे वर्ल्डकपचे समीकरण

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा

 

Related Posts