IMPIMP

Nashik ACB Trap | वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करुन देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपिकावर एसीबीकडून FIR

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन दोन वैद्यकीय बिले (Medical Bill) मंजुरीसाठी पाठवण्यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच्या 5 प्रमाणे 30 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील (District General Hospital Nashik) वरिष्ठ लिपिकाच्या विरुद्ध नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. राजेश सुधाकर नेहुलकर Rajesh Sudhakar Nehulkar (वय-55) असे लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या युनिटने (Nashik ACB Trap) आज (सोमवार) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 44 वर्षाच्या व्यक्तिने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nashik ACB Trap) 10 ऑगस्ट रोजी तक्रार केली होती. तक्रारदर यांनी त्यांच्या पत्नीच्या आजारपणाचे दोन वैद्यकीय बिलं पुढील कार्यवाही साठी पाठवण्यासाठी राजेश नेहुलकर यांच्याकडे 10 ऑगस्ट रोजी दिली होती. वैद्यकीय बिलं पुढील कारवाईसाठी पाठवण्यासाठी नेहुलकर यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाच्या 5 टक्के प्रमाणे 30 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

 

नाशिक एसीबीच्या युनिटने 10 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता,
तक्रारदार यांच्या पत्निचे दोन वैद्यकीय बिले पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी राजेश नेहुलकर
यांनी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 24 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार नाशिक एसीबीच्या पथकाने राजेश नेहुलकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Satish Bhamare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे (Police Inspector Sandeep Salunkhe),
पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, नितीन कराड, प्रवीण महाजन, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik ACB Trap | FIR by ACB against district general hospital clerk who demanded Rs 30 thousand bribe to approve the amount of medical bill

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खडकीच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणार्‍यांना शिवाजीनगर परिसरातून अटक

NCP | भाजपकडून शिंदे गटाला ‘रसद’, दसरा मेळाव्यासाठी दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा आरोप

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

 

Related Posts