IMPIMP

Nashik Accident | नाशिकमध्ये आणखी एका प्रवासी बसला आग, 24 तासांत दुसरी घटना

by nagesh
 Nashik Accident | another bus catches fire in st bus running on vani gad nashik Bus Accident news

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Accident | औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची (Bus Fire) घटना ताजी असतानाच वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थररा पहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे (Shree Saptshrungi Gad Vani) जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) लालपरी बसने (ST Bus) अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील (Nashik Accident) सर्व प्रवासी भाविक सुखरुप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

आज दुपारी नाशिकच्या (Nashik Accident) वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वणी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली. धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

 

नाशिक-नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

 

Web Title :- Nashik Accident | another bus catches fire in st bus running on vani gad nashik Bus Accident news

 

हे देखील वाचा :

Harbhajan Singh On Punjab Cricket Association | पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजन सिंगने केला ‘हा’ गंभीर आरोप

Maharashtra Politics | 40 आमदार पैशांचा पाऊस पाडतायेत, कुठून आले कोट्यवधी रूपये, आमचे बारीक लक्ष; अजित पवारांचा इशारा

Bajaj Allianz Life Insurance | बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा कारनामा; पॉलिसी धारकाला 46 लाखांचा गंडा

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

 

Related Posts