IMPIMP

Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

by nagesh
Nagpur Suicide News | a suicide 28 year old woman jump in lake with a girl

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | नाशिक जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले (Nashik Crime) आहे. येथील मखमलाबादमध्ये 3 अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलेश मुळे (Nilesh Mule), प्रमोद जाधव (Pramod Jadhav), सिद्धू धोत्रे (Sidhu Dhotre) असं या मृत मुलांचे नावे आहेत. हे तिन्ही मुले अंदाजे 14 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी, हे तिन्ही मित्र आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर मित्रांसह पाटावर पोहण्यासाठी गेले होते.
पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण खेळत होते. मात्र पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या 5
जणांमधील तिघे जण पाण्यात बुडू लागले. आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांनी आरडा ओरडा केला. तेथील स्थानिकांना मदतीसाठी
आरडाओरडा केला. (Nashik Crime)

 

दरम्यान, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या 2 मुलांनी तेथील ठिकाणाहून पळ काढला. यानंतर तेथील स्थानिक नागरीक दाखल झाले. पाण्यात तिघे बुडाल्याचे आढळल्याने याबाबत माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे जवान (Fire Brigade) तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले. यानंतर तिन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु दुर्दैवाने उपचारापुर्वी तिघाही मुलांचा मृत्यु (Died) झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. त्यावेळी संबधित मुलांच्या कुटुंबांनी एकच आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik Crime | unfortunate death of 3 school children who went for a swim in the water at nashik

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी गारपीट, 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

 

Related Posts