IMPIMP

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

by nagesh
ITR Update | itr update can you set off losses in stock market to reduce your tax liabilities

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Alert) सध्या कॅश ट्रांजक्शनबाबत खुप सतर्क झाले आहे. मागील काही वर्षात प्राप्तीकर विभागाने बँक (Bank), म्यूच्युअल फंड हाऊस (Mutual Fund House), ब्रोकर प्लॅटफॉर्म (Broker Platform) इत्यादी गुंतवणूक प्लॅटफार्मवर जनतेसाठी रोख व्यवहार कठोर केले आहेत. (Income Tax Alert)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कॅश ट्रांजक्शन (Cash Transaction)
अनेक असे ट्रांजक्शन असतात, ज्यांच्यावर इन्कम टॅक्सची नजर असते. बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे जर तुम्ही मोठे रोखीचे व्यवहार केले तर त्यांना प्राप्तीकर विभागाला माहिती द्यावी लागते. अशाच 5 ट्रांजक्शनबाबत जाणून घेवूयात, ज्यामुळे अडचणीत येऊ शकता.

 

1 बँक मुदत ठेव (Fixed Deposit) :
जर एका आर्थिक वर्षात फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10 लाखापेक्षा जास्त जमा केल्यास याची माहिती इन्कम टॅक्स विभागाशी शेयर केली जाते. यामध्ये कॅश ट्रांजक्शन शिवाय डिजिटल ट्रांजक्शन आणि चेकबुकच्या माध्यमातून ट्रांजक्शनचा सुद्धा समावेश आहे. ज्या बँकेच्या एफडी अकाऊंटमध्ये या लिमिटपेक्षा जास्त डिपॉझिट असेल, त्यास आणि जमा करणार्‍यास इन्कम टॅक्सकडून नोटीस (income tax notice) येऊ शकते. (Income Tax Alert)

2 बँक बचत खाते जमा (Saving Account) :
जर एका आर्थिक वर्षात सेव्हिंग आकऊंटसमधून 10 लाख कॅश काढली असेल किंवा जमा केली आहे तर बँक ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला शेयर करते. यामध्ये डिजिटल व्यवहारांचा समावेश नाही. करंट अकाऊंटसाठी हे कॅश लिमिट 50 लाख रुपये आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3 क्रेडिट कार्डच्या बिलाचा भरणा (Credit Card)
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला तर कॅश जमा करणे टाळा. एका आर्थिक वर्षात जर क्रेडिट बिलच्या रूपात 1 लाखापेक्षा जास्त कॅश जमा केली तर याची माहिती टॅक्स डिपार्टमेंटला दिली जाते. जर क्रेडिट कार्डचे बिल एका आर्थिक वर्षात 10 लाखापेक्षा जास्त झाले तरी सुद्धा टॅक्स विभाग नोटीस जारी करू शकते. यामध्ये डिजिटल ट्रांजक्शनसह कॅश ट्रांजक्शनचा सुद्धा समावेश होतो.

 

4 प्रॉपर्टी ट्रांजक्शन (Property Transition)
प्रॉपर्टीमध्ये 30 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास रजिस्ट्रार याची माहिती टॅक्स विभागाला देतात.
यामध्ये कॅश आणि डिजिटल दोन्ही प्रकारचे ट्रांजक्शनचा समावेश असतो.

 

5 शेयर, म्युचुअल फंड, डिबेंचर आणि बाँडची खरेदी
जर तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असाल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अशा इन्स्ट्रुमेंट्समध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचे रोख व्यवहार करता येतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यामुळे यापैकी कोणत्याही गुंतवणुकीची तुमची योजना असेल, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोकड वापरू नका.

 

Web Title :- Income Tax Alert | income tax alert these 5 cash transactions that can get you an income tax notice

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

 

Related Posts