IMPIMP

Navratri Festival | नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास सूट; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतून वाढीव दिवसाचा निर्णय

by nagesh
Navratri Festival | Exemption for use of loudspeakers on Navratri festival also till 12 midnight on 1st October

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Navratri Festival | यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी (Navratri Festival) रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक (Loudspeaker) व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

 

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे (Environment and Climate Change Department) ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 अन्वये वर्षामध्ये एकूण 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून 13 दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, 2 दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात (Navratri Festival) साजरा करता यावा यासाठी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी
नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, 3 ऑक्टोबर आणि मंगळवार,
4 ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.

 

Web Title :- Navratri Festival | Exemption for use of loudspeakers on Navratri festival also till 12 midnight on 1st October

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार उद्धव ठाकरे हेच 2023 पर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष, कपील सिब्बल यांचा दावा

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Amol Mitkari | ते बंडखोर 16 आमदार अपात्र ठरणार का?, सर्वत्र चर्चा सुरू असताना अमोल मिटकरींचे सूचक ट्विट,…तर शिंदे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल

 

Related Posts