IMPIMP

Nawab Malik | नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

by nagesh
Nawab Malik | NCP Minister nawab malik targets devendra fadnavis on ed raid bjp use sharad pawar ncp

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | मागील अनेक दिवसांपासून मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपावर (BJP) जोरदार प्रहार केला. यामुळे मलिक आणि भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी झडताना दिसल्या. यानंतर आता नवाब मलिकांनी आपल्या निवासस्थानी धाड पडणार असल्याचे सूतोवाच ट्वीट केलं. यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

‘गेली सात वर्ष या देशात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत राहिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव निश्चित झाल्यानंतर सपाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला लागलीय. महाराष्ट्रात देवेंद्रजी गेल्या सात वर्षांपासून तपास यंत्रणांचा वापर करत होते. निवडणुकांच्या आधी पवार साहेबांना नोटीस काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थान केलं होतं. आता आम्ही त्यांना उघडं करत असताना माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, या पद्धतीने ते पाठपुरावा करत आहेत,’ असं मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

 

‘माजी मुख्यमंत्री माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. आणि किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं,’ असा टोला मलिक यांनी ट्वीटमधून लगावला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुढे नवाब मलिक म्हणाले, ‘राजकीय द्वेष ठेवून लोकांवर कारवाई केली जात आहे हे आता उघड होतंय.
माझं म्हणणं आहे तुम्ही मागून करू नका, जबाबदारी स्वीकारा आणि कारवाई करा. आम्ही कुणाला घाबरत नाही.
आम्ही थांबणार नाहीत. तर, काही यंत्रणेतले अधिकारी मला माहिती देत रहातात. दिल्लीहून काही लोक आले होते रात्री.
पण माझ्या घरी आले नाहीत. मी घरातल्या लोकांना सांगून आलो आहे की त्यांना काही चहा-बिस्किट द्या.
त्यांना कारवाई करू द्या, आपण त्यांना मदत करू. पण त्यांना कळलं पाहिजे, हे सर्व अधिकारी राजकीय द्वेष ऐकत नाहीत.
काही लोक या भूमिकेला विरोध करतात ही माहिती माझ्याकडे आहे.

 

Web Title :- Nawab Malik | NCP Minister nawab malik targets devendra fadnavis on ed raid bjp use sharad pawar ncp

 

हे देखील वाचा :

Monalisa Viral Video | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने लोकांसमोर मारली पतीच्या कानशिलात, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

 

Related Posts