IMPIMP

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

by nagesh
Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Raj Kundra | बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) काही दिवसांपूर्वी पोलिसाच्या कोठडीत होता. राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती असून, सध्या न्यायालयानं त्याला जामीन दिली आहे. त्याला अश्लील चित्रपटनिर्मिती (Raj Kundra Pornography Case) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु जामीन मिळाल्यानंतर मात्र त्यानी अश्लील चित्रपट निर्मित प्रकरणाबद्दल मौन धारण केलं होतं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

राज कुंद्रानं (Raj Kundra) नुकतंच एका निवेदनमध्ये आपला मौन सोडलं आहे. तो म्हणाला, ‘घडलेल्या या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून, आयुष्यात कोणत्याही पॉर्नोग्राफी निर्मितीमध्ये किंवा वितरणात माझा सहभाग नाही’ असं म्हटलं आहे. पुढे राज म्हणाला, “घडलेला सगळा प्रकार मला बदनाम करण्याचा एक मोठा कट होता. त्यामुळे या प्रकरणाबद्दल मी सध्या काहीही बोलू शकत नाहीये. संबंधित खटल्यातील सुनावणीला मी तोंड देणार असून, मला नक्कीच न्याय मिळेल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि शेवटी न्यायालयात सत्याचाच विजय होईल. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे सोशल मीडिया आणि माझ्या कुटुंबानी मला आधीच दोषी ठरवले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून मला विविध प्रकारचा मानसिक त्रास होत आहे. तसेच माझ्या बद्दल नकारात्मकता पसरून मला खूप प्रमाणात ट्रोल केलं जातय. त्यामुळे सर्वप्रथम सोशल मीडियाकडून सुरू असलेलं ट्रोल बंद करावं आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे.”

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, राज कुंद्रा म्हणाला, “माझे कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे.
तर सध्या इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला पूर्णपणे विश्वास आहे की घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.
त्यामुळे माझा अधिकार अबाधित राहावा, अशी इच्छा आहे.” तर राजचं केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.
चित्रपटनिर्मिती प्रकरणांमध्ये राज (Raj Kundra) दोषी असल्यास, नक्कीच त्याचावर कारवाई करण्यात येईल.
मात्र यामध्ये सहभाग असल्यास लवकरच तो या समस्यांमधून मोकळा होईल.

 

Web Title :- Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

Sanjay Raut | संजय राऊतांचा गृहमंत्री अमित शहांवर पलटवार, म्हणाले – ‘हॉटेल ब्लू सीमध्ये काय ठरलं होतं?’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’

 

Related Posts