IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘…म्हणून राजद्रोहाचा कलम दुरूस्त करा किंवा रद्द करा’

by nagesh
Maharashtra Election | ncp suspended rebel candidate suspended rebel candidate satish itkelwar nagpur election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निवासस्थानासमोर म्हणणार असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेच्या (Shivsena) समर्थकांनीही ‘मातोश्री’ (Matosree) आणि राणा यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. त्यावेळी राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील 124 – (अ) हे राजद्रोहाचे गंभीर कलम लावण्यात आले होते. अशाच प्रकारे देशातील अनेक ठिकाणी या कलमाच्या गैरवापरा संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कलम 124 – (अ) हे इंग्रजांच्या काळात वाढत्या स्वातंत्र्य चळवळीला दाबण्याच्या उद्देशाने भारतीय दंड विभागात (Indian Penal Code) समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र सध्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात किंवा लोकशाही मांडण्यात आलेला विरोधी विचार दाबण्यासाठी या कलमाचा गैरवापर झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या कलमाची दुरूस्ती करण्यात यावी किंवा हे कलम रद्द करण्यात यावे, असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार (Koregaon-Bhima Violence Case) घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर सूचना
मांडण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी 11 एप्रिलला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मत मांडलं आहे.
त्यासोबतच शरद पवार यांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यात (Information Technology Act) सुधारणा होणं गरजेचं असल्याचंही म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून कोणताही खोटा अपप्रचार कोणत्याही उत्तरदायित्वाविना पसरवला जाऊ शकतो.
सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियावर (Digital Media) योग्य नियंत्रण नाही.
यामुळे खोट्या बातम्या आणि अपप्रचाराच्या माध्यमातून समाजात धार्मिक,
जातीय तेढ व गंभीर तणाव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो,
त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पवारांनी केली आहे.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sedition clause in constitution is misused either amend it or cancel it says ncp chief sharad pawar

 

हे देखील वाचा :

Soha Ali Khan-Kunal Khemu | अभिनेत्री सोहा खानने पती कुणाल खेमूला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते झाले विचलित

PMRDA | ‘पीएमआरडीए’ च्या प्रारूप विकास योजनेवरील हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

Side Effects Of AC | जर तुम्ही सुद्धा रोज करत असाल AC चा वापर, तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

 

Related Posts