IMPIMP

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, ‘त्या’ प्रकरणात होता आरोपी

by nagesh
NCP MLA Jitendra Awhad | Jitendra Awad's bodyguard's suicide, 'that' case was the accused

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या तत्कालीन बॉडीगार्डने (Bodyguard)
आत्महत्या केली आहे. हा जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांना मोठा धक्का मानला जात आहे. वैभव कदम (Vaibhav Kadam) असे
आत्महत्या केलेल्या (Committed Suicide) बॉडीगार्डचे नाव आहे. वैभव कदम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र अनंत
करमुरे प्रकणात कदम हे आरोपी होते आणि या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु होती. कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अनंत करमुरे (Anant Karmure) यांनी 5 एप्रिल 2020 रोजी तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Government) मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. याच रागातून आव्हाड यांचे पोलीस अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी करमुरे यांना घरातून उचलून आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर घेऊन गेले.

त्याठिकाणी मारहाण केल्याचा आरोप करमुरे यांनी केला होता. आव्हाड यांच्या सांगण्यावरुन आणि त्यांच्या घरीच मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) होते. या सरकारमध्ये आव्हाड हे मंत्री असल्याने विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले होते. या प्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी अटक (Arrest) देखील केली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अंगरक्षक व कार्यकर्त्यांनी करमुरे यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात वैभव कदम हे आरोपी होते. मात्र त्यांची लगेच सुटका झाली. त्यानंतर करमुरे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवावं, अशी मागणी करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : NCP MLA Jitendra Awhad | Jitendra Awad’s bodyguard’s suicide, ‘that’ case was the accused

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | विकासाची दृष्टी असलेला नेता हरपला – मोहन जोशी

Pune Crime News | पुण्यात भरदिवसा व्यापार्‍यास ‘दृश्यम स्टाईल’ने लुटणार्‍या मास्टरमाइंडला समर्थ पोलिसांकडून अटक; 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण…

MP Girish Bapat Passed Away | पुण्याच्या विकासाची दुरदृष्टी असलेला नेता हरपला, पुणे पोरकं झालं..!, बापटांच्या निधनानं अनेकांना अश्रू अनावर

 

Related Posts