IMPIMP

प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरदारांनी लक्ष द्या ! 1 एप्रिलपासून लागू होऊ शकते सॅलरीची नवीन सिस्टीम, जाणून घ्या काय होणार परिणाम

by bali123
big benefits government employees increase salaries

नवी दिल्ली : येत्या 1 एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षानंतर पगारदार वर्गाला मोठ्या बदलांचा सामना करावा लागणार आहे. कारण आता सर्व पगारदार वर्गासाठी सरकारकडून ‘पगार salary व्यवस्था’ आणली जात आहे. जर ही व्यवस्था लागू झाल्यास तुमच्या खात्यात पगाराची रक्कम कमी येऊ शकते. याचा परिणाम पगारदारांवर होणार आहे.

गेल्या वर्षी संसदेत वेतन नियमावली विधेयक ( Code on Wages Bill ) मंजूर झाले असून, आता हे विधेयक 1 एप्रिलपासून लागू होईल, अशी शक्यता आहे. हे लागू झाल्यास सर्व प्रकारच्या कपात झाल्यानंतर हातात येणारा पगार कमी होणार आहे. या नव्या विधेयकानुसार, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार salary ( CTC ) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रूपात द्यावी लागणार आहे.

या कर्मचाऱ्यांवर होणार नाही परिणाम
ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे. त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.

तुमच्या हातात किती येणार पगार?
जर कंपनीने तुमच्या पगारातील 5 टक्के ग्रॅच्युइटीची रक्कम कापली, तर 5 हजार रुपयांमधून 250 रुपये ग्रॅच्युइटी म्हणून कपात होईल. म्हणजेच 5,000 बेसिक पगारातून नोकरदाराच्या हातात 4150 रुपये शिल्लक राहतील. अशावेळी 10 हजार रुपये पगारवाल्या नोकरदाराच्या हातात 4150 (बेसिक) + 5000 (इतर भत्ते) = 9150 रुपये येतील.

अशी असेल पगाराची नवी व्यवस्था?
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार (CTC) 10,000 रुपये असेल तर त्याच्या या पगाराची 50 टक्के म्हणजेच निम्मी रक्कम ही Basic ठेवावी लागेल. यानुसार त्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 5 हजार रुपये होईल आणि याच पगाराच्या 12 टक्के म्हणजेच 600 रुपये PF म्हणून कापले जातील. पण ती रक्कम त्यांचीच असणार आहे. तसेच जितकी रक्कम कपात होईल, तितकीच रक्कम पुन्हा कंपनीला टाकावी लागणार आहे.

शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांचं ठरलं ! राज्याला मिळणार नवा गृहमंत्री ? अजित पवार यांच्यासह ‘या’ नावाची जोरदार चर्चा

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

Related Posts