IMPIMP

Nitin Gadkari On Chandani Chowk Pune | चांदणी चौकातील पूल 2 दिवसांत पाडणार, पुण्यातील वाहतूक समस्येवर उडत्या बसची योजना रामबाण उपाय – नितीन गडकरी (व्हिडिओ)

by nagesh
Nitin Gadkari On Chandani Chowk Pune | union minister and bjp leader nitin gadkari says pune chandani chowk bridge demolish in next 3 days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Nitin Gadkari On Chandani Chowk Pune | पुण्यात वाहतुकीसाठी (Pune Traffic) अडचणीचा ठरणारा चांदणी चौकातील पूल (Chandani Chowk Bridge) पुढील दोन ते तीन दिवसात पाडण्यात येईल, अशी माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. चांदणी चौकातील हा पूल 30 मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच (Twin Towers) स्फोटकांचा वापर केला जाणार असल्याचंही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. तसेच पुण्यातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी पुण्यात उडत्या बसेसची (Flying Bus) योजना आणली तर याचा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari On Chandani Chowk Pune)

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेतल्यानंतर गडकरींनी आज सकाळीच चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

जूनपर्यत नवीन पुलाचे काम होईल

चांदणी चौक उड्डाणपुलाचे 2019 मध्ये या कामाचे टेंडर निघाले होते. नऊ वैयक्तिक मालमत्ता अधिग्रहित करायच्या होत्या. त्यापैकी सात जागा अधिग्रहित झाल्यात. दोन जागा अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. सर्व वेळेत झाले तर जूनमध्ये उड्डाणपुलाचे उद्घाटन करु, असंही गडकरी यांनी सांगितले.

 

 

उडती बस आणि ट्रॉली बस

नितीन गडकरी म्हणाले, आम्ही 165 रोप वे केबल कार (Ropeway Cable Car) बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरुन वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा (Trolley Bus) एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची (Electric Bus) किंमत सव्वा कोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉली बसची किंमत 60 लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं (Pune Municipal Corporation) अशी योजना तयार केली तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो.

 

 

पुणे ते बंगळुर फक्त सव्वातीन तासांत

पुणे-बंगळुर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत (Pune-Bangalore Greenfield Highway) माहिती देताना गडकरी म्हणाले,
पुणे- बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरुन सुरु करणार आहोत.
त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारी वाहतूक तिथूनच वळून जाईल.
त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासात पूर्ण होईल.
हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा मार्ग आहे.
त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा मोठा फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.

 

Web Title : –  Nitin Gadkari On Chandani Chowk Pune | union minister and bjp leader nitin gadkari says pune chandani chowk bridge demolish in next 3 days

 

हे देखील वाचा :

High Cholesterol ची शत्रू आहे ‘ही’ हिरवी डाळ, भिजवून खाल्ल्याने होतील जबरदस्त फायदे

Maharashtra Politics | अशोक चव्हाण यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; 3 माजी मंत्री आणि 9 आमदार भाजपच्या वाटेवर ?

NPS Rule Change | नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमात आजपासून झाले हे मोठे बदल, येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल

 

Related Posts