IMPIMP

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं, पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Nitin Gadkari Threat Case | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या फोन कॉलनंतर (Nitin Gadkari Threat Case) पोलिसांकडून (Nagpur Police) तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार धमकीच्या फोन कॉलचे मंगळुरू (Mangalore) कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना करण्यात आले आहे. एका तरुणीचा मोबाईल नंबर या प्रकरणात समोर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणात नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur CP Amitesh Kumar) म्हणाले, बाळगावातील स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत. ज्या तरुणीचा नंबर देण्यात आला होता. त्या तरुणीला पोलिसांनी शोधलं असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आलं आहे. एकाकडून या तरुणीला फोन आला होता. काही कामानिमित्त तुमचा नंबर देत असल्याचे सांगण्यात आले. कुणी, कुठून केला याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

धमकीचा फोन हा जेलमधूनच

ही तरुणी पूर्वीपासून आजारी होती. त्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. ही सर्व स्थानक पोलिसांकडून आम्हाला मिळाली आहे. आमचे पोलीस पथक त्याठिकाणी दाखल झाले आहे. प्रथम दर्शन जो तपास सुरु आहे त्यामध्ये धमकीचा फोन हा जेलमधूनच (Jail) आल्याचे दिसून येते. बेळगावसह मंगळुरू कनेक्शनही त्यात समोर येत आहे, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं.

 

 

काय आहे प्रकरण?

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात जयेश पुजारी (Jayesh Pujari) या गुंडाच्या नावाने हा
धमकीचा फोन (Nitin Gadkari Threat Case) आला असून 10 कोटींची खंडणी (Extortion) मागितली आहे.
मंगळवारी सकाळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन (Threatening Phone Call) आला.
दोन वेळा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला. त्याने दहा कोटी
रुपयांची खंडणी मागितली. एकापाठोपाठ एक धमकीचे फोन आल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती
पोलिसांना दिली.

 

दरम्यान, यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. मात्र त्याने हे फोन केले नसल्याची माहिती देण्यात
आली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Nitin Gadkari Threat Case | the mystery of the nitin gadkari threat case has increased that girl in hospital

 

हे देखील वाचा :

Baramati Taluka News | कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

Pune News | टेम्पोसह विहिरीत पडलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका, कात्रज-कोंढवा रोडवरील घटना

Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

 

Related Posts