IMPIMP

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

by omkar
House Rent- 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही

नवी दिल्ली: सरकारसत्ता ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये नव्या आदर्श घरभाडे (House Rent) कायद्याला मंजुरी देण्यात आली. या नव्या कायद्यानुसार आता दोन महिन्यांपेक्षा जास्त आगाऊ भाडे घरमालकांना घेता येणार नाही. तसेच भाडेकरू घर सोडत नसेल तर घरमालक अशा परिस्थिती दुप्पट ते चारपट भाडे वसूल करू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे या नव्या कायद्यात घरमालक आणि भाडेकरू यांचे हित जोपासण्यात आले असून घर भाड्यावरून होणारे वाद मिटवण्यास न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्याचा त्यात प्रस्ताव आहे.
दरम्यान, सरकारने २०१९ मध्ये पहिल्यांदा या अधिनियमाचा मसुदा जारी केला होता. हा नवा आदर्श घरभाडे कायदा सगळ्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठवला जाईल.
यामध्ये प्रत्येक राज्य आपल्या सोयीनुसार बदल करतील.

पुण्यात ओम प्रॉपर्टीच्या भागीदारांवर एकाच जागेवरुन दुसरा फसवणुकीचा गुन्हा दाखल

रेंटल हौसिंग मार्केटला येणार वेग

या कायद्याचा उद्देश म्हणजे देशातील रेंटल हौसिंगला वेग देण्याचा आहे. यामुळे घरांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.
या कायद्याने घरमालकाने भाडेपट्टीच्या (House Rent) अटी पूर्ण केल्यास जास्त अधिकार दिले आहेत.
भाडेकरू जर घर सोडत नसेल तर त्याच्याकडून घर मालक सुरुवातील दुप्पट आणि त्यानंतर चारपट भाडे वसूल करू शकतो.
खासगी क्षेत्रातील लोकांचा सहभाग घर भाड्याने देण्याच्या व्यवहारात वाढेल. यामुळे घर टंचाईही कमी होईल.
या कायद्यानुसार संघटित क्षेत्रही सहभागी होऊ शकेल.

दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास आधी सांगावे लागेल

साधरण घरमालक आणि भाडेकरू यांच्यात किती ऍडव्हान्स घ्यायचा किंवा द्यायचा यावर वाद होतो.
आता नव्या कायदयानुसार राहत्या घरासाठी दोन तर गैरनिवासी वास्तूसाठी सहा महिन्यांपर्यंत ऍडव्हान्स ठरवण्यात आला आहे.
यानुसार मुंबई, बंगळुरूत दरमहाचे भाडे (House Rent) सहा पट तर दिल्लीत ते दोन ते तीन पट असेल.
महत्त्वाचे म्हणजे घरातील दुरुस्तीचे काम करायचे झाल्यास भाडेकरूला २४ तास आधी सांगावे लागेल त्याचबरोबर भाडेकरूच्या पाणी व वीज पुरवठ्यात घरमालक कपात करू शकणार नाही.

Also Read:- 

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

Related Posts