IMPIMP

Nora Fatehi | नोराचा डान्स संपल्यानंतर तिच्या सहकलाकाराने केले असे कृत्य; नेटकरी झाले संतप्त

by nagesh
Nora Fatehi | norah fatehi viral video background dancer touching her inappropriately at fifa 2022

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Nora Fatehi | बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. ती तिच्या तालावरून चाहत्यांचे हृदयाचे ठोकेही चुकवत असते. अनेक चाहते तिच्या डान्सचे दिवाने आहेत. फिफा विश्वचषक 2022 ची चर्चा सगळीकडेच आहे. नोरादेखील या फिफा वर्ल्ड कपमध्ये सामील झाली होती. यामधील तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये तिने भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्याने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे, तर काही नेटकऱ्यांना ते खटकलेलेदेखील दिसत आहे. (Nora Fatehi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नोराचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये ती फिफा वर्ल्ड कपमध्ये नृत्य करताना दिसत आहे, तर याच डान्समध्ये शेवटी डान्स करणारा एक कलाकार येऊन नोराला विचित्र पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. या त्याच्या कृत्यावरून नेटकरी भडकल्याचे दिसत आहेत, तर एका नेटकऱ्याने मात्र त्याची बाजू घेत कदाचित तो तिचा ड्रेस नीट करत असावा अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर या ना त्या कारणाने वायरल होताना दिसत आहे. (Nora Fatehi)

 

 

नोरानी मात्र डान्स सादर केल्यानंतर मंचावर भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’ ची घोषणादेखील दिली आहे. याने प्रेक्षक तिचे कौतुक करत आहेत, तर सध्या नोरा कलर्स टीव्हीच्या ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. नोरा मूळची कॅनडाची असून तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nora Fatehi | norah fatehi viral video background dancer touching her inappropriately at fifa 2022

 

हे देखील वाचा :

Arjun Kapoor | पुन्हा एकदा अर्जुन कपूरची पोस्ट चर्चेत; म्हणाला – ‘तुमच्या कर्माची फळं…’

Pune Pimpri Crime | देहूरोड येथील आरटीआय कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts