IMPIMP

Sanjay Raut | ‘वाह रे वा यांचं परिवर्तन… योगी… भोगी ?’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay rauts says wow the transformation of ray yogi and bhogi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनSanjay Raut | जगात कोणताही धर्म जर अकारण हिंसेचा मार्ग अवलंबत असेल तर तो धर्म आणि समाज अधोगतीला जातो, या सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांच्या विधानाचे स्वागत केले पाहिजे. आपल्याच देशांमध्ये त्यांनी याचे मंथन आणि चिंतन सुरु करायला हवे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भूमिका राष्ट्रव्यापी आहे. देशात ज्याप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर होत आहे. त्याच प्रकारे देशद्रोही 124A या कलमाचाही गैरवापर होत आहे. अगदी दिल्लीपासून जेएनयू पासून (JNU), उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh Government) आसाम पाणी, महाराष्ट्रात भीमा कोरेगाव दंगल (Koregaon-Bhima Violence) यानंतर ज्या लोकांवर हा गुन्हा (FIR) दाखल झाला त्या संदर्भात देखील देशात चर्चा सुरु आहे.

 

राज्यातील एका दाम्पत्याने महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवण्यासठी फार मोठ्या प्रमाणात कारस्थान केले होते. त्याला एका राजकीय पक्षाचे पाठबळ होते. हे करण्यासाठी अंडरवर्ल्डचा (Underworld), परदेशातील संस्थांचा अथवा अतिरेकी संघटनांचा (Terrorist Organizations) काही हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जी कलमे लावली आहेत यावर वाद होऊ नये, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राज्यात अनेक सभा होत आहेत. आम्ही देखील सभा घेतो. त्या दिवशी राज्यात अनेक सभा आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील, याबद्दल मला माहिती नसल्याचे राऊत म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आले.
अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे.
राज्य सरकारने (State Government) नेहमीच कोर्टाच्या आदेशाचे पालन केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
आता योगी कोण आणि भोगी कोण, यासंदर्भात कुणाचे मत परिवर्तन कसे झाले. हा संशोधनाचा विषय आहे.
एखाद्याला पीएचडी (Ph.D.) करायची असेल तर त्याने ती करावी, असा टोला त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता लगावला.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay rauts says wow the transformation of ray yogi and bhogi

 

हे देखील वाचा :

PM Kisan ManDhan Yojana | 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना होणार फायदा, दरमहिना बँकेत येईल 3,000 रुपये पेन्शन

Hypertension | ‘हाय ब्लड प्रेशर’च्या रुग्णांनी सेवन कराव्यात ‘या’ 4 गोष्टी, होणार नाही समस्या

Devendra Fadnavis | 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं ?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Related Posts