IMPIMP

OBC Reservation | ओबीसी राजकीय आरक्षणावरुन आता उपमुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

by nagesh
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | NCP leader ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis led maharashtra government for neglecting farmer related issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी (OBC Reservation) राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती (Election postponed) दिली आहे. यानंतर निवडणुकाच नको अशी भूमिका अनेक नेत्यांनी घेतलेली असताना, आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. घ्यायच्या असतील तर सगळ्या निवडणुका घ्या, थांबवायच्या असतील तर सगळ्या थांबवा ही महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) भूमिका असल्याचे मत अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) मिळालेल्या स्थगितीबाबत बोलताना व्यक्त केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

उद्या ओबीसीचे आरक्षण (OBC Reservation) टाकत असताना तसेच कुठं काढायचे यासारखे यक्ष प्रश्न आहे. यासाठी आता न्यायालयात आम्ही टॉपचे वकील लावणार आहोत. त्यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही दिल्लीत पाठवण्यात आले आहे. तेथील वकीलांसोबत ते आमची बाजू मांडत आहेत त्यांच्या सोबतही चर्चा करण्यात येणार आहे. न्यायालयाने त्यासाठी 13 तारीख दिली आहे, पण तोपर्यंत न थांबता त्या आधी काही आपल्याला करता येईल का हे पाहिले जात असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

 

विरोधकांना सुनावले

यावेळी अजित पवार यांनी विरोधकांनाही सुनावले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसींसाठीच्या राखीव जागांवरील निवडणूक घेण्यास स्थगिती दिली आहे. त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

महाविकास आघाडी सरकारची भूमिका

चार-पाच राज्यांत असाच प्रसंग आला होता. त्यावेळी न्यायव्यवस्थेने निकाल वेगळा दिला होता
आणि महाराष्ट्रात (Maharashtra) असा निकाल वेगळा दिला आहे,
हे सांगतानाच राज्य सरकारने ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती, तो कायदा स्थगित केलेला नाही.
परंतु ओबीसींच्या जागांवरील निवडणुका थांबवल्या आहेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्य चालवत असताना राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जायचं असतं, तीच भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे.
परंतु आता बाकीच्या खुल्या प्रवर्गातील, एससी, एसटीच्या प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवर निवडणुका होणार आहेत
आणि ओबीसींसाठीच्या राखीव जागांवर निवडणुका होणार नाहीत,
हे न्यायाला धरुन नाही, असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- OBC Reservation | if you want to take hold all elections if you want to stop stop all this is the role of mahavikas aghadi deputy chief minister ajit pawar

 

हे देखील वाचा :

Pune Job | पुण्यातील ‘या’ सरकारी विभागात डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

pm kisan tractor yojna | खुशखबर – सरकार शेतकर्‍यांना देत आहे 50% सबसिडी, ताबडतोब घ्या योजनेचा लाभ

 

Related Posts