IMPIMP

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाबाबत ‘महाविकास’ सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on coronavirus in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनOBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. राज्य सरकारने सादर केलेला मागासवर्गीय अहवाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही (Maharashtra Budget session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात अहवालावरून ताशेरे ओढले. याच पार्श्वभूमीवर आरक्षणाबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation Maharashtra) महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इम्पेरिअल डेटा (Imperial Data) गोळा करण्यासाठी काही नियम आहेत. गावात जाऊन डेटा गोळा करू शकत नाही. आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक (Bill) मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

 

आरक्षणामध्ये कोणीही राजकारण करू नका, 4 ते 5 गावांचा डेटा आम्ही 5 दिवसांमध्ये तयार केला आहे असं कोण म्हणत असेल मात्र तसा डेटा तयार होऊ शकत नाही. मागासवर्गीय आयोगाकडून डेटा गोळा करण्याचं काम केलं जातं. या आयोगाला आम्ही निधी देण्याचं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून आरक्षण वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात निवडणुका (Election) कधी घ्याव्यात याबाबत कायदा आणला आहे. त्याबाबतची माहिती घेण्याचं काम सुरू असून सोमवारी सभागृहात विधेयक मांडलं जाईल, असं अजित पवार म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, मागील वेळी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation Maharashtra) प्रस्ताव (Proposal) मांडला होता.
मात्र काही तांत्रिक बाबींमुळे अडचणी येतात.
यामध्ये मुद्दाम कोणीतरी दबाव आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
मात्र आम्ही कोणाच्याही दबावाला भीक घालत नाही.
ओबीसी आरक्षण हा भावनिक मुद्दा झालेला असून सगळ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

 

Web Title :- OBC Reservation Maharashtra | Maha vikas aghadi government to tabled new bill for obc reservation in the assembly after a cabinet meeting said ajit pawar

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला वरिष्ठ लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शॉर्ट घालून फिरणाऱ्या IT इंजिनिअर तरुणींना शेजाऱ्यांकडून चपलेने मारहाण

Magic Drink | वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ मॅजिक ड्रिंक आणि मिळवा अनेक आरोग्य लाभ, जाणून घ्या ‘ते’ कसे बनवतात?

 

Related Posts