IMPIMP

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

by nagesh
One-Time Pension | one time pension option under ops in place of nps for central government employees

सरकारसत्ता ऑनलाइन – One-Time Pension | ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची (Central Government Employees) नेमणुक वर्ष 1 जानेवारी 2004 आगोदर केली होती. मात्र, ते वर्ष 1 जानेवारी 2004 अथवा त्यानंतर सरकारी सेवेमध्ये रुजू झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (National Pension System) जागी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) (Central Civil Service) नियमांतर्गत कव्हरेज संदर्भात पुन्हा एकदा कार्यालयीन निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यानूसार आता OPS अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन (One-Time Pension) पर्याय असणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सरकारी कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या जागी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 1972 अंतर्गत कव्हरेजसाठी 1 वेळचा पर्याय दिला होता.
वर्ष 1 जानेवारी 2004 आधीच्या रिक्त पदांवर 31 डिसेंबर 2003 रोजी अथवा त्याच्यापुर्वी नेमणुक केलेल्या मात्र 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर सेवेत रुजू झाल्यावर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामगारांना हा पर्याय दिला होता.
एक-वेळचा पर्याय 7 फेब्रुवारी 2020 आणि 31 मार्च 2021 च्या कार्यालयीन निवेदनानुसार दिला होता.
तसेच हा पर्यायाच्या गुंतलेल्या विविध क्रियांसाठी विहित कट-ऑफ तारखा दिल्या होत्या. (One-Time Pension)

 

 

सरकारी कर्मचाऱ्यांनी (Central Employees) विहित काल मर्यादेत पर्याय सादर करून देखील काही कार्यालयांनी या कामांच्या निर्धारित वेळेत हे पर्याय ठरवले नव्हते.
प्रकरणे वेळेत निकाली काढणे आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी खटल्यांच्या प्रक्रियेसाठी कट-ऑफ तारखा विहित केल्या होत्या.
असं निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या निदर्शनास आणून दिलेय.

विभागाने दिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की, ”संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायावर निर्धारित वेळेत प्रक्रिया न करण्याचे कारण म्हणून या कट-ऑफ तारखा घेतल्या जाऊ शकत नाहीत.
म्हणूनच विहित वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पर्यायांवर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती सर्व मंत्रालये आणि विभागांना करण्यात आली आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) लागू झाल्यानंतर, 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर सशस्त्र दल वगळता केंद्र सरकारच्या (Central Government) सेवेतील पदांवर नियुक्त झालेले सर्व सरकारी कर्मचारी अनिवार्यपणे NPS अंतर्गत येतात.
केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम, 1972 आणि अन्य संबंधित नियमांमध्ये सुधारणा केलीय.
31 डिसेंबर 2003 सालानंतर सरकारी सेवेत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होत नव्हते.
दरम्यान, 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम, 1972 अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळावा अशी विनंती केंद्र सरकारकडे केली गेली होती.

 

Web Title :-  One-Time Pension | one time pension option under ops in place of nps for central government employees

 

 

हे देखील वाचा :

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

Nana Patole | पटोलेंविरोधात पुण्यात भाजपकडून फ्लेक्सबाजी ! ”नाना पुण्यात कधी येताय…, ते सांगा”

Pune Crime | गुंडांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना; कळस आणि कोंढव्यात वाहनांची केली तोडफोड

 

Related Posts