IMPIMP

Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award | पहिला पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार प्रदान

by nagesh
Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award | The first Padma Vibhushan Pt. Birju Maharaj Nrityacharya Award

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPadma Vibhushan Birju Maharaj Nrityacharya Award | भारतात गुरू शिष्य परंपरेला दीर्घ इतिहास आहे. मात्र, कोणतीही कला ही शिकून येत नाही, तर ती संस्कारीत व्हावी लागते. शास्त्र समजावून सांगितले जाते, विद्या दिली जाते पण कला ही संस्कारीतच केली जाते असे मत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर (Padma Shri Pt. Suresh Talwalkar) यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त (International Dance Day) आज पायल वृंद संस्था (Payal Vrind Sanstha) आणि कोहिनूर ग्रुप (Kohinoor Group) यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे पहिला पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार (Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award) पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आज पायलवृंद संस्था आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे पुण्यातील ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे (Senior Dance Guru Manisha Sathe), नृत्यगुरु डॉ. नंदकिशोर कपोते (Dance Guru Dr. Nandkishore Kapote) आणि ज्येष्ठ नृत्यगुरु शमा भाटे (Senior Dance Guru Shama Bhate) या नृत्यगुरुंना पहिला पद्मविभूषण पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार (Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award) पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल (Kohinoor Group Director Krishnakumar Goyal), पायलवृंदच्या संचालिका निकीत मोघे (Payal Vrind Director Nikit Moghe) आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन (Sunil Mahajan) आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पं.सुरेश तळवलकर म्हणाले की, ज्यावेळी गुरू एखादी गोष्ट गिरवून घेतो, ठसवून सांगतो त्यावेळेस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या संस्करणाची ही प्रक्रिया घडत असते. ‘महाराजां’कडून संस्कारीत होत आलेली ही नृत्य परंपरा आजच्या पुरस्कारार्थींनी पुढे सुरू ठेवली असल्याने त्यांना आज मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांना मिळालेल्या संस्करणाचा परिपाक आणि परिणाम आहे.

 

यावेळी बोलताना नृत्यगुरु डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले की, कलाकारांच्या नावाने कलाकारांच्या हस्ते पुरस्कार मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. महाराजांकडून मी गुरू शिष्य पंरपरेने नृत्य कला शिकलो. गेल्या 45 वर्षांपासून मी त्यांच्याशी संबंधित होतो. महाराजांनी हजारो सम निर्माण करून कथक नृत्याला महाराजांनी सौंदर्य प्राप्त करून दिले. कथक परंपरेचा उत्तम वारसा लाभलेला असतांना त्यांनी आपली स्वतःची शैली विकसीत केली होती. महाराज घराणे पद्धती मानत नव्हते.
ज्याच्या ज्याच्या कडे जे जे चांगले ते ते आपण टिपून घ्यायला हवे, आत्मसात करायला हवे अशी त्यांची मनोधारणा होती.
आज कथक नृत्यात जी जी घराणी आहेत त्या प्रत्येक घराण्यातून तयार होणऱ्या
नृत्य कलाकारामध्ये महाराजांची झलक आपल्याला आढळून येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे म्हणाल्या की, मी महाराजांची थेट
शिष्या नसतानाही नृत्य परंपरेत मी त्यांनी आदर्श मानले आहे.
त्यांचा आदर्श ठेवला आहे. महाराजांनी जाता-येता या क्षेत्रात मांडलेल्या तत्वज्ञानाचे
आपण ज्यावेळी चिंतन करतो त्यावेळेस थोडेेफार काहीतरी सापडल्यासारखे वाटते.

 

ज्येष्ठ नृत्यगुरु शमा भाटे म्हणाल्या की, आज मिळालेला पुरस्कार हा मी भाग्ययोग मानते.
या क्षेत्रात मी जे काही थोडेफार करू शकले ते गुरूंमुळेच करू शकले याची कृतज्ञता माझ्या मनात आहे.
महाराजांच्या आठवणींनी आज भारावून गेल्यासारखे होत आहे.
लहानपणापासून ते आज वयाच्या 72 वर्षांपर्यंत मी महाराजांचे नृत्य पहात आले.
पण आजही महाराजांसारखे नृत्य मला येत नाही. हे केवळ कथकच्याच बाबतीत नसून
मी भरातात आणि भारताबाहेर नृत्यात काम करणा-या अनेक संस्थांशी परिचित आहे.
परंतु, परमेश्वराने एकच बिरजू महाराज घडविल्याची माझी ठाम खात्री आहे.
कलाकारांचे कलाकार आणि नर्तकांचे नर्तक असे महाराजांचे थोडक्यात वर्णन करता येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पायलवृंदच्या संचालिका निकिता मोघे यांनी केले.
संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी आभार मानले.

 

Web Title :- Padma Vibhushan Birju Maharaj Nritya Charya Award | The first Padma Vibhushan Pt. Birju Maharaj Nrityacharya Award

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्यात 5 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI), पोलीस हवालदार यांच्यावर अँटी करप्शनकडून FIR

PMRDA Encroachment Action | PMRDA कडून मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील अनधिकृत बांधकामावर ‘हातोडा’

Social Media Convention | ‘सोशल मीडियावर मराठीत मोठ्या प्रमाणावर कंटेंट’

 

Related Posts