IMPIMP

Social Media Convention | ‘सोशल मीडियावर मराठीत मोठ्या प्रमाणावर कंटेंट’

दुसऱ्या सोशल मीडिया संमेलनाचे पुणे विद्यापीठात उद्घाटन

by nagesh
Social Media Convention | 'Large amount of content in Marathi on social media', Inauguration of Second Social Media Convention at Pune University'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनSocial Media Convention | मराठीमधून आता मोठ्या प्रमाणावर कंटेंट (Marathi Content) तयार होत असून, हे एक आशादायक चित्र असल्याचे मत मधुरा रेसिपीज या युट्यूब चॅनेलच्या संचालिका मधुरा बाचल (Director Madhura Bachal) यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी (Digital Media Lovers Association), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आणि मिरॅकल इव्हेंट्स (Miracle Events) यांच्या आयोजित दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे (Social Media Convention) आज पुणे विद्यापीठाच्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये उद्घाटन झाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर (Vice Chancellor of Pune University Dr. Nitin Karmalkar), प्रकुलगुरू एन. एस. उमराणी (Vice Chancellor N. S. Umrani), सतीश मगर (Satish Magar), सुमन धामणे (Suman Dhamne), जयंती वाघधरे (Jayanti Waghdhare), डॉ. राजेश पांडे (Dr. Rajesh Pandey), विनायक रासकर (Vinayak Raskar), प्रसेनजीत फडणवीस (Prasenjit Fadnavis), प्रदीप लोखंडे (Pradeep Lokhande), मंगेश वाघ (Mangesh Wagh), समीर आठल्ये (Sameer Athalye) यावेळी उपस्थित होते.

 

 

मधुरा बाचल यांच्या युट्यूब चॅनेलला 63 लाखांच्या वर फॉलोअर आहेत. त्या म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी मला स्वतःला सोशल मीडियावर एकटीच (नोमाड) असल्याचे जाणवायचे. आता मात्र मोठ्या प्रमाणावर मराठीमध्ये कंटेंट तयार होत असून, हे खूप उत्साह आणणारे आणि आशादायक चित्र आहे. त्याचा मराठीला ही खुप फायदा होत आहे.”

 

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “आम्ही विद्यापीठ म्हणून लाखो विद्यार्थी आणि इतरांनाही जोडलेले आहोत. या संमेलनामुळे सोशल मीडियाबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि जागृती होईल. लोखंडे म्हणाले, “सोशल मीडियाने सगळ्यांना एका पातळीवर आणले आहे. या सगळ्याकडे एका व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास एक मोठी संधी आहे. त्यातून भारताला जगभरात पुढे येण्यासाठी मदत होईल.

 

मंगेश वाघ यांनी प्रास्ताविक केले आणि संमेलनाचा (Social Media Convention) उद्देश सांगितला. ते म्हणाले, “सोशल मीडियावर वावरणाऱ्या सगळ्यांचे हे संमेलन आहे. सोशल मीडियामुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण व्यक्त होत आहे. त्या व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाचे हे संमेलन आहे. जगातल्या 15 कोटी मराठी भाषकांच्या हा उत्सव आहे.” यावेळी सुमन धामणे, सतीश मगर यांचीही भाषणे झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोशल मीडियाचे प्रॉडक्ट बनू नका

मराठी सोशल मीडिया संमेलनात उदघाटनानंतरच्या पहिल्या सत्रात दैवता चव्हाण-पाटील आणि नितीन वैद्य यांनी ‘समाजमाध्यमाची दिशा आणि दिशांतरे’ या विषयावर मार्गदर्शन केले.

 

 

पाटील म्हणाल्या, “सोशल मिडियाचा वापर वाढू लागल्यानंतर त्याच्याशी निगडित संशोधनही (Research) वाढत आहे. यामध्ये सोशल मीडियाच्या वापरामुळे वागणुकीतील बदल, कन्झ्युमर रिसर्च (Consumer Research), सोशल मीडियाचे व्यसन (Social Media Addiction), त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती, राजकीय निवडणूक, सोशल मीडियावरील चळवळी, शिक्षण क्षेत्रात सोशल मीडियाची भूमिका आणि सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करता येणारे आणि न करता येणारे असे दोन गट यांच्यावर आधारित संशोधन अशा विविध विषयांचा समावेश आहे. या संशोधनातून मानवी वर्तणुकीतील काही महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित झाले आहे.

सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये एकलकोंडेपणा (डी-ह्युमनायझेशन-Dehumanization), आत्ममग्न (सेल्फ ऑबसेशन) आणि आपण एखादे सेलिब्रिटी आहोत असे मानून सतत स्वतःच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले.”

 

वैद्य म्हणाले,” सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रकार घडत आहे. ‘फेक न्युज’ हा त्याचाच एक भाग आहे. त्यावर कसलेही नियंत्रण नाही. मात्र, यामुळे एका मोठ्या वर्गाला फायदा होत आहे. आपण सोशल मीडियाचे प्रॉडक्ट्स झाले आहोत. 2014 पूर्वी सोशल मीडियावर ह्रदयद्रावक घटना, यशस्वी घटना अशा पोस्ट अधिक वाचल्या जात असत, मात्र 2014 नंतर द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट जास्त वाचल्या जात असून, त्याचा प्रसारही वाढत आहे. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे आपण प्रेमाचे, सकारात्मकतेचे प्रतीक बनायचे आहे की द्वेषाचे हा निर्णय ज्याचा त्याने करायचा आहे. सोशल मीडियाचा वापर करताना आपण त्या माध्यमाचे बळी ठरणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. या सत्राचे सूत्र संचालन स्नेहल दामले यांनी केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियातून सकारात्मक ऊर्जा मिळावी

माझं एक्स्प्रेशन, माझं इम्प्रेशन हा दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्राचा विषय होता.
या सत्रात स्वामीराज भिसे, दिया ओस्तवाल, जुही देशमुख आणि डॉ. मानसी भट यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.
सोशल मीडिया वापरताना काय भूमिका बाळगली जाते,
व्यक्त होण्यापलीकडे सोशल मीडिया कसा उपयोगी आहे या विषयावर या चारही सहभागींना आपली भूमिका मांडली.
आपली भूमिका मांडताना दिया ओस्तवाल म्हणाल्या, सोशल मीडिया हा व्यक्त होण्याचा मार्ग आहे.
हे व्यासपीठ नसते तर, नवीन पिढीसाठी व्यक्त होणे अवघड झाले असते.
प्रत्यक्षात व्यक्त होण्यासाठी काही मर्यादा येतात अशावेळी सोशल मीडिया योग्य माध्यम ठरले.
तर स्वामीराज म्हटले, सोशल मीडिया हे व्यक्त होण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
परंतु, कोविडकाळात या सोशल मीडियाचा वापर सामाजिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला गेला.
मागील दोन वर्षात सोशल मीडियाने खूप नवीन गोष्टी दिल्या आणि त्या सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या ठरल्या.

 

 

डॉ. मानसी भट म्हणाल्या, सोशल मीडिया हे बदल घडविणारे माध्यम आहे.
त्यामुळे त्याचा योग्य गोष्टीसाठी करणे, अतिवापर करून त्याचे व्यसन होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे.
जनजागृती, नवीन माहिती उपलब्ध करून देणे, गरजुंना मदत उपलब्ध करून देणे
ही सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका असून ती पूर्ण झाली पाहिजे.
तर जुही देशमुख म्हणाल्या, सोशल मीडिया हे व्यासपीठ मोठे असले तरीही त्यात काही व्यक्तिगत मर्यादा येतात.
प्रत्यक्षात भेटण्यात, बोलण्यात, एखाद्या विषयावर चर्चा करण्यात जो आनंद असतो तो सोशल मीडियावर पूर्णपणे मिळत नाही.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सोशल मीडियाचा आधार घेणं किंवा त्यावर आनंद शोधणं शक्य नाही.
या सत्रात मुकुल जोशी यांनी सूत्रधार म्हणून काम पाहिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Social Media Convention | ‘Large amount of content in Marathi on social media’, Inauguration of Second Social Media Convention at Pune University

 

हे देखील वाचा :

Symptoms Of Tomato Allergy | जाणून घ्या काय आहे टमाट्याची अ‍ॅलर्जी आणि त्याची लक्षणं

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार’; भीम आर्मीचा इशारा

Salt Intake | डाएटमध्ये कमी कराल मीठाचे सेवन तर शरीराला होतील हे 7 फायदे!

 

Related Posts