IMPIMP

Panipat Crime News | दुर्दैवी ! चहा बनवताना घडली दुर्घटना; पती-पत्नीसह 4 मुलांचा होरपळून मृत्यू

by nagesh
Panipat Crime News | family died in gas cylinder blast in panipat haryana know in detail

पानिपत : वृत्तसंस्था – Panipat Crime News | आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय हरियाणातील पानिपत या
ठिकाणी आला आहे. या दुर्घटनेत एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्वस्थ झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले
आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. तसेच कोणालाही घरात जाण्यास मनाई करण्यात आली
आहे. (Panipat Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?
पानिपतमधील बिचपडी गावातील गल्ली क्रमांक चारमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. गॅस सिलिंडरला आग लागल्यामुळे हि दुर्घटना घडली आहे. हि आग एवढ्या वेगाने पसरली कि त्यांना आतून बाहेर पडण्याची किंवा आवाज करण्याची संधीही मिळाली नाही. (Panipat Crime News)

 

या अपघातात संपूर्ण कुटुंब जळून खाक झाले होते. शेजारी पोहोचेपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. मृतांमध्ये पती-पत्नी आणि 4 मुलांचा समावेश आहे. अब्दुल, अफरोज, दोन मुली रेश्मा, इशरत आणि दोन मुले अब्दुल, अकफान अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हा अपघात सिलिंडर फुटल्याने झाला नसून लिकेजमुळे झाला आहे असा प्राथमिक अंदाज एसपी शशांक कुमार सावन यांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Panipat Crime News | family died in gas cylinder blast in panipat haryana know in detail

 

हे देखील वाचा :

Maharashtra Government Recruitment | राज्यातील नोकरभरती होणार 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण?; शासकीय यंत्रणा लागली कामाला

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

Aurangabad ACB Trap | घराचा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts