IMPIMP

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

by omkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel ) च्या वाढत्या किमतींनी सध्या सर्व विक्रम मोडले आहेत. दोन दिवसानंतर आज पुन्हा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आज 4 जूनला सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol-Diesel) 27 पैसे प्रति लीटर तर, डिझेल 28 पैसे प्रति लीटर महाग केले आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 100.98 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे. यापूर्वी 1 जूनरोजी पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी घेतली होती.

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

जून महिन्यात पेट्रोल-डिझलचे दर दोन वेळा वाढवण्यात आले तर मे महिन्यात तब्बल 17 वेळा वाढ झाली.
या वाढीनंतर पेट्रोल 4.17 रुपये प्रति लीटरने महाग झाले.
तर डिझेलच्या रेटमध्ये सुद्धा 4.60 रुपयांची वाढ दिसून आली.
अनेक शहरात सध्या पेट्रोलचे दर 100 रुपए प्रति लीटरच्या पुढे गेले आहेत.

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे.
या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात Petrol-Diesel चे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते.
ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते.
या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात.
मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

Also Read:- 

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

 

Related Posts