IMPIMP

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा, अडचणीत वाढ

by nagesh
IPS Rashmi Shukla | ajit pawar slams cm eknath shinde phone tapping case maharashtra assembly winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनPhone Tapping Case | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) दिलासा मिळाला असतानाच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत (Telegraph Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान आजच (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई (Strict Action) न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश (orders) देण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका (Petition) दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेससह (Congress) विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रकरणात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांची संभाषणं रेकॉर्ड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनीही शुक्लांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावलं आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), शालेय राज्य मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu), आशिष देशमुख (Ashish Deshmukh) व संजय काकडे (Sanjay Kakade) यांचे तब्बल 60 दिवस फोन टॅप केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.

 

शुक्ला या सध्या हैदराबाद येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.
शुक्ला यांच्यावर असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने चौकशी करुन राज्य सरकारला (State Government) अहवाल सादर केला होता.
या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :-  Phone Tapping Case | mumbai police registered case against IPS rashmi shukla under telegraph act

 

हे देखील वाचा :

Corporator Maya Barne | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आणखी एक धक्का ! नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा

Pune Metro | पुणे मेट्रो कॉंग्रेसची देणगी ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का नाही? माजी आमदार मोहन जोशी म्हणाले – ‘भाजपचे कोत्या वृत्तीचे राजकारण’

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाबाबत ‘महाविकास’ सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

 

Related Posts