IMPIMP

Pune Metro | पुणे मेट्रो कॉंग्रेसची देणगी ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का नाही? माजी आमदार मोहन जोशी म्हणाले – ‘भाजपचे कोत्या वृत्तीचे राजकारण’

by nagesh
Pune Metro | Traffic changes in Yerawada area for Metro work

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन शहरामध्ये मेट्रो रेल्वे (Pune Metro) आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे (Congress Party) आहे, हे भाजपच्या नेत्यांनी (BJP Leader) लक्षात ठेवावे आणि मेट्रोचा (Pune Metro) पाठपुरावा करणारे माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Of Maharashtra Prithviraj Chavan) यांना मेट्रोच्या उदघाटन (Metro Inauguration In Pune) सोहळ्याचे निमंत्रण का नाही ? असा काँग्रेसचा सवाल असून भाजपने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरातील विविध योजनांचा गाजावाजा भाजपने सुरु केलेला आहे. पण, या योजनांचा पाया काँग्रेसने घातला हे पुणेकर जाणून आहेत. येत्या रविवारी मेट्रोचे उद्घाटन होत आहे. हा मेट्रो प्रकल्पही (Pune Metro) काँग्रेसनेच आणला. २००१ साली स्थायी समितीत (PMC Standing Committee) मेट्रोची मंजुरी झाली तेव्हा काँग्रेसच्या संगीता देवकर स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांच्या सूचनेवरून हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २००८ साली दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (Delhi Metro Rail Corporation) पुणे मेट्रोसाठी प्रारुप आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले. जून २०१२ मध्ये राज्य सरकारने (Maharashtra Government) मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्याच महिन्यात काँग्रेस आघाडी सरकारने प्रकल्प आराखडा केंद्र सरकारला सादर केला. २०१३ साली तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ (Former Minister Kamal Nath), कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रदीर्घ बैठक घेतली आणि केंद्राकडे पुणे मेट्रो मंजुरीची मागणी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्र सरकारच्या २०१३च्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी ९ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद प्रथमच करण्यात आली. ७ डिसेंबर २०१६ रोजी मेट्रो प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली. हा घटनाक्रम पाहाता काँग्रेस पक्षाने सन २००० पासून पुण्याला मेट्रो मिळावी यासाठी अथक प्रयत्न केले हे दिसून येईल. शिवाय, केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध खात्यांच्या परवानग्या माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालून मिळविल्या. पण भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधामुळे मेट्रोला उशिर झाला आणि २०१४ ऐवजी २०१६ मध्ये केंद्राची मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मग, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का देण्यात आलेले नाही? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे. आमदार म्हणून मी सुद्धा विधीमंडळात पुण्याच्या मेट्रोच्या मागणीचा मुद्दा वारंवार मांडलेला आहे. असेही जोशी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

 

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमांना भाजपने पक्षीय स्वरुप देऊन निवडणुकीचा प्रचार चालविला आहे ते निषेधार्ह आहे.
तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न देऊन
भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे.
भाजपने काही नेत्यांना हायजॅक केलेच आता कामाचे श्रेयही हायजॅक करू पहात आहेत,
अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Metro | Congress Pune Metro ! Why isn’t former Chief Minister Prithviraj Chavan invited? Former MLA Mohan Joshi says upon ‘BJP’s attitude politics’

 

हे देखील वाचा :

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाबाबत ‘महाविकास’ सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला वरिष्ठ लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शॉर्ट घालून फिरणाऱ्या IT इंजिनिअर तरुणींना शेजाऱ्यांकडून चपलेने मारहाण

 

Related Posts