IMPIMP

Piles | मुळव्याधीच्या वेदनांनी असाल त्रस्त तर जाणून घ्या त्याचे कारण, प्रकार आणि घरगुती उपचार

by nagesh
Piles | how to get rid of piles know the cause type and cure

सरकारसत्ता ऑनलाइन – मूळव्याध (Piles) हा आजार धोकादायक नाही, पण खूप त्रासदायक आहे. मूळव्याधीची समस्या गुदद्वाराच्या किंवा गुदाशयातील नसांना सूज आल्याने होते. मूळव्याधची समस्या (Piles) गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील भागात असू शकते. या आजाराची अनेक कारणे असू शकतात, जसे की बद्धकोष्ठतेची तक्रार, खाण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त वेळ शौचास बसणे, पचनाशी संबंधित समस्या (Constipation, Wrong Eating Habits, Prolonged Defecation, Digestive Problems) ही या आजाराची सर्वात मोठी कारणे आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मूळव्याधच्या समस्येची इतरही अनेक कारणे आहेत जसे की वाढते वय, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि एनल सेक्स करणे. मुळव्याध म्हणजे काय? त्याचे प्रकार किती आणि ते कसे रोखायचे ते जाणून घेवूयात (Let’s Know About The Types Of Piles And How To Prevent Them)…

 

मूळव्याधीचे प्रकार (Types Of Piles) :
रक्त मूळव्याध (Blood Piles) ज्यामध्ये रुग्णाला स्टूलसह रक्त येते, हळूहळू रक्त जास्त येऊ लागते. यामुळे रुग्णाला कोणताही त्रास होत नसला तरी मूळव्याधीचा त्रास होतो.

 

बादी मूळव्याध :
या प्रकारच्या मूळव्याधीत रुग्णाचे पोट खराब राहते आणि पोटात सतत गॅस तयार होतो. या मूळव्याधीत जळजळ, दुखणे, खाज सुटणे, शरीरात अस्वस्थता, कामात मन न लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही मूळव्याधची लक्षणे जाणवत असतील तर घरीच उपचार सुरू करा.

 

मुळव्याधची कारणे आणि उपाय (Causes And Remedies Of Piles)

टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसू नका (Don’t Sit On The Toilet Seat Too Long) :
जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल तर जास्त वेळ टॉयलेटमध्ये दबाव टाकू नका. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने गुदद्वाराभोवती रक्तवाहिन्यांना सूज येते, ज्यामुळे अस्वस्थता वाढते. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अधिक पाणी आणि द्रव पदार्थ प्या (Drink More Water And Liquid) :
द्रव पदार्थ तुमचे स्टूल सैल करतात, ज्यामुळे मल बाहेर जाणे सोपे होते आणि बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते. बद्धकोष्ठतेच्या आजारामुळे तुम्हाला जास्त दाब द्यावा लागतो आणि मुळव्याधची समस्या वाढते.

 

आहारात फायबरचे सेवन करा (Eat Fiber) :
मुळव्याध रोखायचे असेल तर आहारात फायबरचे सेवन करा. फायबर युक्त आहारात तुम्ही धान्य आणि हिरव्या पालेभाज्यांचा (Grains And Green Leafy Vegetables) समावेश करू शकता.

 

ताक सेवन करा (Consume Buttermilk) :
मूळव्याधच्या उपचारात ताकाचे सेवन खूप प्रभावी आहे. तुम्ही ताकामध्ये भाजलेले जिरे आणि काळे मीठ टाकून त्याचे सेवन करा, यामुळे पचन व्यवस्थित होईल. जर पचनक्रिया चांगली असेल तर मल जाण्यास त्रास होत नाही आणि मुळव्याधचा त्रासही होणार नाही.

 

अ‍ॅपल व्हिनेगरचे सेवन करा (Drink Apple Vinegar) :
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) रक्तवाहिन्या संकुचित होण्यास मदत करते.
रक्त मूळव्याध असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर टाकून दिवसातून दोनदा प्या, आराम मिळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंजीराचे सेवन करा (Eat Fig) :
जर मूळव्याधचा त्रास होत असेल तर एका ग्लास पाण्यात तीन अंजीर भिजवा.
भिजवलेले अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खा आणि त्याचे पाणीही सेवन करा, फायदा होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Piles | how to get rid of piles know the cause type and cure

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

Maharashtra Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा चटका ! आगामी 2 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

 

Related Posts