IMPIMP

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात 10वा हप्ता लवकर जारी होणार आहे. अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, PM Kisan योजनेचा 10वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत येईल. मात्र, याबाबत केंद्र सरकार आणि अधिकृत वेबसाइटकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

तसेच शक्यता व्यक्त केली जात आहे की, 10वा हप्ता जारी होण्याच्या दरम्यानच सरकार शेतकर्‍यांना देण्यात येणारी ही मदत रक्कम दुप्पट करू शकते. जर असे झाले तर शेतकर्‍यांच्या खात्यात 4000 रुपये येतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काही शेतकर्‍यांना मिळेल दुप्पट फायदा

PM Kisan चा पुढील हप्ता जारी होताना काही शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे येऊ शकतात. हे ते शेतकरी आहेत, ज्यांनी 9वा हप्ता जारी होण्याच्या दरम्यान रजिस्ट्रेशन केले होते.

परंतु अर्जात एखादी चूक असल्याने किंवा एखाद्या इतर कारणामुळे पैसे त्यांच्या खात्यात येऊ शकले नव्हते. मात्र, या दरम्यान जर तुम्ही चूक अजूनपर्यंत सुधारली नसेल तर तुमचे 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा अडकू शकतात.

 

असे जाणून घ्या खात्यात पैसे आले किंवा नाही

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा.

6. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या कारणांमुळे पीएम किसानचे पैसे अडकू शकतात

बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.

IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.

शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.

गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल. (PM Kisan)

 

Web Title :- PM Kisan | 10th installment of pm kisan scheme will be released soon but double money will come in the account of some farmers

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts