IMPIMP

PM Kisan Mandhan Yojana | शेतकर्‍यांना सरकार देईल 36 हजार रुपये, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

by nagesh
Modi Government | cabinet approves interest subvention on short term agriculture loan upto rs 3 lakhs other decisions

नवी दिल्ली : वृत्त संस्था PM Kisan Mandhan Yojana | भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण असे असूनही शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक नुकसानीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे. पीएम किसान मानधन योजनेसह (PM Kisan Mandhan Yojana) शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवत आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दरवर्षी 36 हजार रुपये दिले जातात. मात्र, सरकार ही रक्कम शेतकर्‍यांना पेन्शन स्वरूपात देते आणि दरमहा 3 हजार रुपये मिळतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पेन्शनसाठी जमा करावे लागतील थोडे पैसे

पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकर्‍यांना दरवर्षी अत्यंत नाममात्र रक्कम जमा करावी लागते. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

वयोमानानुसार शेतकर्‍याने दरमहा किती रक्कम जमा करायची हे ठरविले जाते.
ही रक्कम 55 ते 200 रुपये दरमहा होते. या पेन्शन फंडची (Pension Fund) लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (LIC) देखरेख केली जाते.

पीएम किसान मानधन योजनेनुसार, ज्या शेतकर्‍यांचे वय 18 ते 29 वर्षे दरम्यान आहे,
त्यांना 55 ते 109 रुपये जमा करावे लागतील.
30 ते 39 वर्षे वयोगटातील शेतकर्‍यांना दरमहा 110 ते 199 रुपयांपर्यंत हप्ता भरावा लागेल.

याशिवाय जो शेतकरी वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेईल, त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.
शेतकर्‍याला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकार दरवर्षी 36 हजार रुपये आणि दरमहा 3 हजार रुपये देते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PM Kisan Mandhan Yojana | pm kisan mandhan yojana farmers will get rs 36000 every year and three thousand monthly know what they have to do

 

हे देखील वाचा :

PMRDA Development Plan | पीएमआरडीएच्या विकास आराखडा हरकतींवर 14 मार्च पासून सुनावणी; जाणून घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या भागातील सुनावणी होणार

Pune Crime | शेतीला पाणी देण्यावरुन झालेल्या भांडणात भावांमध्ये तुंबळ हाणामारी अन् खुनाचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि फसवणूक, पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांवर गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

 

Related Posts